शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना झापलं, उद्धव ठाकरेंनी गोऱ्हेंचं कौतुक केलं; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 16:14 IST

''तुम्ही मंत्री असाल तुमच्या घरी..." अशा शब्दात नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांन अधिवेशनात झापलं.

मुंबई: सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सातत्याने टीका करत आहेत. दरम्यान, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटलांना कडक शब्दात खडसावल्याचा प्रकार समोर आला. ''मंत्री असाल तुमच्या घरी...." अशा शब्दात नीलम गोऱ्हेंनी गुलाबरावांना झापलं. गोऱ्हेंच्या त्या कृतीचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं आहे.

उद्धव ठाकरेंकडून नीलम गोऱ्हेचं कौतुक

नीलम गोऱ्हे लिखित पुस्तकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन पार पडलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "विधिमंडळात आक्रस्ताळेपणा करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटलांना झापलं ते योग्यच केलं. सभागृहाची एक उंची आहे, तिथे कसं वागलं पाहिजे, याचे काही नियम आहेत. मंत्री असो वा कुणीही असो, सभागृहात आल्यावर त्याने शिस्तीत वागलं पाहिजे. विधिमंडळात शिस्तीचा आग्रह प्रत्येकाने पाळायला हवा, तुम्ही तो नेहमी पाळता आणि जे पाळत नाही त्यांना योग्य शब्दात खडसावताही. सभागृहात शिस्तीचा आग्रह धरल्याबद्दल आपले आभार", अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हे यांचे कौतुक केले. 

ते पुढे म्हणाले की, "तो कोण होता, म्हणून तुम्ही त्याला खडसावलं, याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देत नाही. तुम्ही ज्या पदावर बसलात त्याला न्याय देताना सभागृहाची उंची पाळून संबंधिताला योग्य शब्दात समज दिली गेलीच पाहिजे. अगदी उद्या मुख्यमंत्री जरी तसे वागले, मग तो कोणताही मुख्यमंत्री असो, तेव्हासुद्धा कान उघाडण्याचे काम तुम्हाला करावे लागणार आहे. सभागृहाची उंची पाळावीच लागणार, गैरवर्तनाला अजिबात थारा नाही,'' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

विधिमंडळात नेमकं काय झालं..?"महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी 18 तारखेला शिक्षकांच्या निधीवरुन प्रश्न विचारला. यावेळी खाली बसून गुलाबराव पाटील काहीसे कुजबुजत होते. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांना समज दिली. त्यावर गुलाबरावांनी मला बोलायचं आहे, असं म्हणत हातवारे केले. उपसभापती ताई आपण मध्ये बोलू नका, असं म्हणत गुलाबरावांनी नीलम गोऱ्हे यांच्या दिशेने इशारा केला. त्यानंतर नीलम गोऱ्हे चांगल्याच संतापल्या. "तुम्ही आताच्या आता खाली बसा. तुमची ही बोलायची पद्धत आहे का? छाती बडवून विधान परिषदेत काय बोलता, मंत्री असाल तुमच्या घरी..." अशा शब्दात नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना खडसावलं

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेUddhav Thackerayउद्धव ठाकरेGulabrao Patilगुलाबराव पाटील