शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Bhaskar Jadhav : "शिवसेना अंगार आहे, आगीशी खेळण्याचा प्रयत्न केला तर राजकीय कारकीर्द जळून भस्मसात होईल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 19:06 IST

Shivsena Bhaskar Jadhav : "उद्धव ठाकरे यांनी अतिशय योग्य पाऊल उचललं आहे. ही तर सुरुवात आहे अशा अनेक पक्षांसोबत खूप सावधगिरीने युती करण्याची गरज आहे."

शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (Shivsena Bhaskar Jadhav) यांनी संभाजी बिग्रेड आणि शिवसेना यांच्या युतीवर प्रतिक्रिया दिली आहे. "गेली 25 ते 30 वर्ष शिवसेनेने एकाच पक्षाच्या खांद्यावर मोठ्या विश्वासाने मान ठेवली होती. मात्र केसाने गळा कापण्याचे काम मित्रपक्षाने केलं" असं म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच "शिवसेना अंगार आहे, तो ज्वलंत निखारा आहे. आगीशी खेळण्याचा कोणी प्रयत्न केला तर खेळणाऱ्यांची राजकीय कारकीर्द जळून भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही" असा इशाराही भास्कर जाधव यांनी दिला आहे. 

"भाजपाने संभाजी बिग्रेड आणि शिवसेना युतीचा धसका घेतला आहे. याच कारण असं की, गेली 25 ते 30 वर्ष शिवसेनेने एकाच पक्षाच्या खांद्यावर मोठ्या विश्वासाने मान ठेवली होती. मात्र केसाने गळा कापण्याचे काम मित्र पक्षाने केलं" असं म्हणत भास्कर जाधव यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच "शिवसेनेशी युती असताना मात्र या पक्षाने अनेक पक्षाची युती केली आणि मित्र पक्षांना संपवलं. पण याच दरम्यान शिवसेनेने कोणाशी युती केली नाही" असंही म्हटलं आहे. 

"अनेक पक्षांसोबत खूप सावधगिरीने युती करण्याची गरज"

"उद्धव ठाकरे यांनी अतिशय योग्य पाऊल उचललं आहे. ही तर सुरुवात आहे अशा अनेक पक्षांसोबत खूप सावधगिरीने युती करण्याची गरज आहे. कारण शेवटी ही शिवसेना टिकावी ही फक्त शिवसैनिकांची इच्छा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची आणि देशातील जनतेची इच्छा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी संभाजी बिग्रेडसोबत केलेली युती योग्य असून मी तिचं स्वागत करतो" असंही सांगितलं. यासोबतच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून सध्या राजकारण सुरू आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

"शिवसेना अंगार आहे, तो ज्वलंत निखारा आहे"

"शिवसेनेचा दसरा मेळावा हा एक इतिहास आहे. 56 दसरा मेळावा घेण्याच्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेला, एक चिन्ह, एक झेंडा असलेला पक्ष म्हणजे शिवसेना आहे. दसरा मेळावा शिवसेनेचा असला तरी तो या देशाचा मान आणि शान आहे. त्यामुळे अशा मेळाव्याला विरोध होईल असं मला वाटत नाही. जर कोणी असा विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना प्रेमाचा सल्ला आहे. शिवसेना अंगार आहे, तो ज्वलंत निखारा आहे. आगीशी खेळण्याचा कोणी प्रयत्न केला तर खेळणाऱ्यांची राजकीय कारकीर्द जळून भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही" असं देखील भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवShiv SenaशिवसेनाBJPभाजपा