शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचं मुंबईवर बेगडी प्रेम; अमित शाहांच्या दौऱ्यावर अंबादास दानवेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 11:28 IST

राज्यपालांकडे असणाऱ्या विषयांबाबत गेली २-३ वर्ष पाठपुरावा केला ते निर्णय आता राज्यपाल २-३ मिनिटांत घेतायेत असं दानवेंनी म्हटलं.

नाशिक - अमित शाह गणपती दर्शनासाठी आलेत, परंतु मुंबईचं महत्व कमी कसं होईल? हे पाहिलं जात आहे. मुंबईवर भाजपाचं बेगडी प्रेम आहे अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. त्याचसोबत सामना हे ज्वलंत विचारांचं वर्तमानपत्र आहे. त्याचे विचार महाराष्ट्रपुरते मर्यादित राहत नाहीत तर देशपातळीवर विचार जातात. ज्वलंत विचार वर्तमानपत्रातून व्यक्त करतात असंही म्हटलं आहे. 

अंबादास दानवे म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गणपतीच्या दर्शनासाठी मुंबईत आलेत. परंतु मुंबईचं महत्व कसं कमी होईल? मुंबईवर बेगडी प्रेम दाखवायचं. मुंबईतील अनेक कार्यालयात अहमदाबादला नेले. याचा अर्थ मराठी माणूस, मुंबईचं महत्त्व कमी करून अहमदाबादचं महत्त्व वाढवण्याचा प्रकार सुरू आहे. परंतु महाराष्ट्राने सातत्याने यावर मात केली आहे असं त्यांनी सांगितले. 

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात दाद मागूविधान परिषदेच्या १२ जागांसाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे नावांची यादी पाठवली होती. परंतु ती यादी राज्यपालांनी रद्द केली. त्यावर दानवेंनी टोला लगावला आहे. राज्यपालांकडे असणाऱ्या विषयांबाबत गेली २-३ वर्ष पाठपुरावा केला ते निर्णय आता राज्यपाल २-३ मिनिटांत घेतायेत. फार कार्यतत्परतेने निर्णय घेतले जात आहेत. राज्यपालांनी मागील सरकारने दिलेली १२ जणांची शिफारस यादी रद्द केली त्याबाबत निश्चित कायदेशीर भूमिका घेऊ असं त्यांनी म्हटलं. शिवसेना निवडणुकीच्या मैदानात दिसेलसामना अग्रलेखातून भाजपाचा कमळाबाई असा उल्लेख केल्यानंतर भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी आम्ही तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला पेग्विन सेना म्हणायचं का? असा चिमटा शेलारांनी काढला होता. त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर देत सांगितले की, शिवसेना कुठली सेना हे निवडणुकीच्या मैदानात दिसेल. महाराष्ट्र विरोधक असो वा आशिष शेलारांना शिवसेना काय आहे ते स्पष्ट दिसेल असं म्हटलं आहे.  

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेBJPभाजपाAmit Shahअमित शाह