शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

Ambadas Danve : "गुलाबराव पाटीलच उंदराची चिंधी"; अंबादास दानवेंचं जोरदार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 15:32 IST

Shivsena Ambadas Danve And Gulabrao Patil : ""गुलाबरावांची दोन महिन्यांपूर्वीची भाषणे तपासली पाहिजे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेलं सामना हे वृत्तपत्रं आहे. त्यांच्या विचारावर चालणारं हे वृत्तपत्रं आहे."

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून नव्या सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. याच दरम्यान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली. "सामनातून झालेली टीका म्हणजे उंदराला सापडली चिंधी, ती इकडे ठेऊ की तिकडे ठेऊ, एवढंच काम चाललंय" असं म्हणत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Shivsena Ambadas Danve) यांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "गुलाबराव पाटीलच उंदराची चिंधी" असं म्हणत पलटवार केला आहे. 

"गुलाबरावांची दोन महिन्यांपूर्वीची भाषणे तपासली पाहिजे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेलं सामना हे वृत्तपत्रं आहे. त्यांच्या विचारावर चालणारं हे वृत्तपत्रं आहे. सामनातून जे सांगितलं ते सत्यच आहे. भाजपाने महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवली आहेत. सामना हे बाळासाहेबांच्या विचारांचं दैनिक आहे. त्यामुळे सामनावर टीका करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. टीका करणारे गुलाबराव पाटील हेच उंदराची चिंधी आहेत" अशी बोचरी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

आशिष शेलार यांनी शिवसेना साफ करण्याची भाषा करू नये. ही कीड उपटून टाकण्याआधी गावितांवर जे भाजपाने आरोप केले होते, ती कीड शेलारांनी आधी दूर केली पाहिजे. जे खासदार शिंदे गटात आले, त्यांच्यावर भाजपाने आरोप केले ती कीड दूर केली पाहिजे. सोमय्यांनी शिंदे गटातील आमदारांवर लावलेल्या आरोपांचं काय झालं? ही कीड शेलारांनी दूर केलीय का? असा दानवे यांनी केला. 

"सामना जर कागदाचा लगदा आहे तर त्याची दखल का घेता? मीडिया त्यावर बातम्या का करते? तुम्ही सामनाला का सीरियसली घेता? सोडून द्या. त्यावर बोलूच नका. लगदा असेल तर हा लगदा उलटा घुसतो तेव्हा कळेल त्यांना" असं देखील अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.  

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेGulabrao Patilगुलाबराव पाटीलShiv SenaशिवसेनाBJPभाजपा