शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Aaditya Thackeray : "एका अतिरेक्याला मानसन्मान का दिला, तेव्हा कोणाचं सरकार होतं?"; आदित्य ठाकरेंचा रोखठोक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 16:02 IST

Shivsena Aaditya Thackeray Slams BJP : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी याकूब मेमन प्रकरणावर भाष्य केलं आहे. 

मुंबई - १९९३ बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेननला ७ वर्षापूर्वी मुंबईच्या बडा कब्रिस्तान इथं दफन करण्यात आले होते. मात्र त्याच्या कबरीवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. याकूबची कबर मार्बल आणि लायटिंगनं सुशोभीकरण करण्यात आली आहे. त्यावरून भाजपाने मागील महाविकास आघाडी सरकारला दोषी धरत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यावर आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Shivsena Aaditya Thackeray) यांनी भाष्य केलं आहे. 

"एका अतिरेक्याला एवढा मानसन्मान का दिला, तेव्हा केंद्रात आणि राज्यात कोणाचं सरकार होतं?" असा रोखठोक सवाल विचारला आहे. "सणासुदीच्या काळात राजकारण करू नये. याकूब मेमन प्रकरणातील काही तथ्य लोकांसमोर येणं गरजेचं आहे. आरोप करणं हे खूप सोपं असतं पण खरं बोलणं हे कधी कधी कठीण असतं, खरं बोलणं आज गरजेचं आहे. त्या माणसाचं दफनच का झालं? तो अतिरेकी होता. त्याचं दफन करण्याची गरज नव्हती. दफन करायचं असेल तर एनओसी घ्यायची असते. ती का घेतली नाही? पालिकेचा या प्रकरणाशी संबंध नाही" असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

"एका अतिरेक्याला एवढा मानसन्मान का दिला?"

"ती एक खासगी संस्था आहे. एका अतिरेक्याला एवढा मानसन्मान का दिला? तेव्हा केंद्रात आणि राज्यात कुणाचं सरकार होतं? कदाचित निवडणुका जवळ आल्यात म्हणून परत काहीतरी घडवून आणायचं यामुळे त्यांनी आज हे सगळं केलं असेल. पण थोडी माहिती घेऊन आरोप करणं गरजेचं आहे"असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, याकूब मेननच्या कबरीच्या सुशोभिकरणासाठी अलिखीत परवानगी महाविकास आघाडी सरकारने दिली. मविआ आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदासाठी किती तडजोड केली हे यावरून स्पष्ट झाले आहे. भाजपा या प्रकाराचा तीव्र निषेध करत आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राची प्रतिमा खालावली. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सरकारला करण्यात आली आहे.  

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा