‘शिवस्मारक जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ ठरेल’

By Admin | Updated: December 23, 2016 04:54 IST2016-12-23T04:54:18+5:302016-12-23T04:54:18+5:30

अरबी समुद्रात उभे राहात असलेले भव्यदिव्य असे शिवस्मारक हे जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ ठरेल, असा विश्वास राज्याचे

Shivsammar to be world renowned tourist destination | ‘शिवस्मारक जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ ठरेल’

‘शिवस्मारक जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ ठरेल’

महाड : अरबी समुद्रात उभे राहात असलेले भव्यदिव्य असे शिवस्मारक हे जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ ठरेल, असा विश्वास राज्याचे बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी पाचाड येथे व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रातील भव्य अशा शिवस्मारकाचे भूमिपूजन होत आहे. या भूमिपूजनासाठी रायगड जिल्हा भाजपा वतीने किल्ले रायगडवरील ‘माती’ आणि ‘जल’ मुंबई येथे नेण्यात आले. यानिमित्ताने पाचाड येथे आयोजित करण्यात आलेल्या एका छोटेखानी सोहळ्यामध्ये चव्हाण बोलत होते. (वार्ताहर)

Web Title: Shivsammar to be world renowned tourist destination