शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

एसटीमध्ये सेवा देणार शिवनेरी सुंदरी; टोलमाफी मिळण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 09:18 IST

बैठकीत विविध खात्यांच्या तब्बल ७० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एटी) संचालकांच्या बैठकीमध्ये मुंबई- पुणे मार्गावरील ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना आदरातिथ्य सेवा देणारी शिवनेरी सुंदरी नेमण्याचा ठराव मंजूर झाला आहे. प्रवाशांच्या तिकिटावर याचा कोणताही अधिभार लागणार नसल्याचे एसटीचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी सांगितले. एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची ३०४ वी  बैठक मंगळवारी झाली. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व एसटी महामंडळाचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

बैठकीत विविध खात्यांच्या तब्बल ७० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. एसटीला महाराष्ट्रामध्ये टोलमाफी मिळण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचा ठरावदेखील बैठकीमध्ये मंजूर करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ एसटीच्या ३४३ बसस्थानकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र’ या नावाने दवाखाना सुरू करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. प्रवाशांबरोबरच आसपासच्या नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या व औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित संस्थांना बसस्थानकांवरील ४०० ते ५०० चौ.मी.ची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे,  तसेच त्या संस्थेमार्फत आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब व मेडिकल स्टोअर सुरू करण्यात येणार आहे. 

आगारांची संख्या २५३ होणार चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासीबहुल प्रदेशांमध्ये एसटीचे नवे आगार निर्माण करण्यात येणार असून, या आगाराच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या २५३ होणार आहे.

नवीन २,५०० साध्या बस खरेदी करणार एसटी महामंडळाच्या प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटांना स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारून १० बाय १० आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवीन २,५०० साध्या बस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे, तसेच १०० डिझेल बसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे, अशा विविध विषयांना  या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.

टॅग्स :state transportएसटी