आढळराव-पाटील शिवसेनेतच, पक्षाकडून स्पष्टीकरण; चर्चांना पूर्णविराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 12:25 IST2022-07-03T12:24:30+5:302022-07-03T12:25:19+5:30
आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं.

आढळराव-पाटील शिवसेनेतच, पक्षाकडून स्पष्टीकरण; चर्चांना पूर्णविराम
शिरूर लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचंही नमूद करण्यात आलं होतं. दरम्यान, यावर आता शिवसेनेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
'३ जुलै रोजी सामना दैनिकात आलेली बातमी ही अनावधानाने छापण्यात आलेली असून शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेना उपनेते म्हणून शिवसेनेतच कार्यरत आहेत,' अशी माहिती शिवसेनेकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आढळराव पाटील यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं. 'गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब' असं ट्वीट त्यांनी केलं होतं.