विनापरवानगी शिवरायांचा पुतळा बसविला, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Updated: May 17, 2025 00:00 IST2025-05-16T23:58:49+5:302025-05-17T00:00:53+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांचा विनापरवानगी पुतळा उभारण्यात आल्यानंतर अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

विनापरवानगी शिवरायांचा पुतळा बसविला, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
योगेश पांडे, नागपूर: रात्रभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा विनापरवानगी पुतळा उभारण्यात आला. त्यानंतर शासकीय मालमत्तेचे नुकसान केले म्हणून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मौजा खैरी येथे हा प्रकार घडला आहे. १४ मे रोजी रात्री दोन ते चार वाजताच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी मुख्य मार्गाच्या बाजूला शासकीय जागेत ग्रामपंचायतीने लावलेले पेव्हर ब्लॉक्स फोडले आणि तेथे विटांच्या मदतीने पाच फुटांचा चौथरा तयार केला. त्यानंतर तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हा पुतळा कुणी उभारली, याची कुणालाही माहिती नव्हती. मात्र, ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सचिव निळकंठ माणिकराव देवगडे यांनी तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३२९ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.