शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"राज्यात शिवद्रोहींचा उच्छाद, कोरटकरला चिल्लर भूषण, तर सोलापूरकरला थिल्लरभूषण पुरस्कार जाहीर करा’’, शरद पवार गटाचा खोचक सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 16:58 IST

NCP SP Criticize Mahayuti Government: सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याचं औचित्य साधून महायुती सरकारने प्रशांत कोरटकरला ‘चिल्लर भूषण’ आणि राहुल सोलापूरकरला ‘थिल्लर भूषण’ पुरस्कार जाहीर करावा, असा सल्ला शरद पवार गटाने दिला आहे.

मागच्या काही दिवसांपासून अभिनेता राहुल सोलापूरकर आणि कथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या केलेल्या अपमानाचा मुद्दा गाजत आहे. या दोघांवरही कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमींकडून होत आहे. दरम्यान, या मुद्द्या वरून  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाने महायुती सरकारला खोचक सल्ला दिला आहे. सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याचं औचित्य साधून महायुती सरकारने प्रशांत कोरटकरला ‘चिल्लर भूषण’ आणि राहुल सोलापूरकरला ‘थिल्लर भूषण’ पुरस्कार जाहीर करावा, असा सल्ला शरद पवार गटाने दिला आहे.

महायुती सरकारला १०० दिवस पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने या संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात म्हटले आहे की, महायुती सरकारला १०० दिवस पूर्ण झाले. ह्या १०० दिवसांत महाराष्ट्राने अनुभवला तो फक्त सत्ताधारी पक्षांमधला अंतर्विरोध, अनागोंदी, अस्थिरता ह्याशिवाय महाराष्ट्राने काय पाहिलं? काहीच नाही. त्यात शिवद्रोहींनी महाराष्ट्रात उच्छाद मांडलाय, त्यांना मुक्तसंचाराची मुभा दिली गेली आहे म्हणून आमची महाराष्ट्र सरकारला विनंती आहे कि, १०० दिवस पूर्ण झाल्याचं औचित्य साधून सरकारने प्रशांत कोरटकरला ‘चिल्लर भूषण’ आणि राहुल सोलापूरकरला ‘थिल्लर भूषण’ पुरस्कार जाहीर करावा, असा खोचक सल्ला शरद पवार गटाने दिला आहे.

अभिनेता राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या वजीर आणि त्याच्या पत्नीला लाच देऊन आग्र्याहून सुटले. पेटारे-बिटारे काही नव्हते. चक्क लाच देऊन ते तिथून बाहेर पडले त्यासाठी किती हुंडा वटवला याचे पुरावेही आहेत, असा दावा केला होता. त्यावरून शिवप्रेमींमध्ये संताप निर्माण झाला होता.  दुसरीकडे कथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने इंद्रजित सावंत यांना धमकी देताना शिवरायांबाबत अनुद्गार काढले होते.  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahayutiमहायुती