शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या सत्तांध हत्तीवर शिवसेना अंकुश मारणारच, उद्धव ठाकरेंकडून पुन्हा स्वबळाचा हुंकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 15:54 IST

शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे.

महाड (रायगड) -  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नेत्यांकडून शिवसेनेची युतीसाठी मनधरणी होत आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. महाड येथे झालेल्या रायगड लोकसभा मतदार संघ शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करताना शिवसेना भाजपच्या सत्तांध हत्तीवर अंकुश मारणारच असे सांगत  उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला पाहिजे, असी गर्जना केली आहे.  यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, "सध्या राज्यात पाण्याचा दुष्काळ आहे. पण थापांचा दुष्काळ मात्र नाही. निवडणुका येताच भ्रमाचे भोपळे, गाजरे गावागावात वाटली जातील. मात्र मला सत्तेचा मोह नाही. शिवसैनिकांचं प्रेम हीच माझ्यासाठी केवढी मोठी सत्ता आहे. आता भाजपाच्या सत्तांध हत्तीवर अंकुश मारणारच. कोणत्याही परिस्थितीत पुढच्या निवडणुकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला पाहिजे." तसेच पक्षवाढीसाठी राज्यभर दौरे करणार असल्याची घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली.  शिवसेना यापुढे स्वबळावर लढणार आहे. याचे रणशिंग फुंकले आहे. मावळे समोर आहेत. आता लढाईची सुरुवात झालीय. देशाचं वातावरण आणि राजकारण बिघडत चालले आहे. राम मंदिरासाठी जमवलेल्या विटा या मंदिरासाठी नव्हत्या तर तुमच्या सिंहासनापर्यंत पोहोचण्यासाठीच्या पायऱ्या होत्या, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी  केला. रायगड लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आज महाड येथे मेळावा झाला. यावेळी ठाकरे बोलत होते. 2019 निवडणूक येणार आहे. यात काय होणार याची नाही तर लोकांचं काय होणार, देशाचे काय होणार याची चिंता असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाRaigadरायगड