Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree: भाजपा सर्व शक्ती राणांमागे उभी करणार? नवनीत यांची फडणवीस, राणेंना साद; बडे कायदेतज्ज्ञ पोहोचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 18:37 IST2022-04-23T18:36:48+5:302022-04-23T18:37:31+5:30
Navneet Rana Arrested by Khar Police: राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यसभा खासदार संजय राऊत आणि अनिल परबांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी जल्लोष सुरु केला आहे.

Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree: भाजपा सर्व शक्ती राणांमागे उभी करणार? नवनीत यांची फडणवीस, राणेंना साद; बडे कायदेतज्ज्ञ पोहोचले
खासदार नवनीत राणा, रवी राणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे त्यांची आजची रात्र खार पोलीस ठाण्यातच जाणार असून उद्या त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांनी राणा दाम्पत्याला खार पोलीस ठाण्यात नेताच राणा यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे.
या व्हिडिओमध्ये नवनीत राणा यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना साद घातली आहे. पोलीसांनी आम्हाला जबरदस्तीने पोलीस ठाण्यात नेले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नारायण राणेंच्या राज्यात लोकशाही धोक्यात आली आहे. आम्हाला मदत करावी, असे राणा म्हणाल्या.
त्याच्या काही वेळा आधीच नारायण राणेंनी पोलिसांनी राणा दाम्पत्याला बाहेर काढले नाही तर मी स्वत: राणांच्या घरी जाणार, त्यांना बाहेर काढणार, बघतो कोण काय करतो ते, असे आव्हान दिले होते. राणा यांना अटक झाल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी याचा निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यसभा खासदार संजय राऊत आणि अनिल परबांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी जल्लोष सुरु केला आहे. त्यांच्या घरासमोर फटाके, ढोलताशे आणि घोषणाबाजी सुरु केली आहे.
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ रिझवान मर्चंट हे आपल्या सहकाऱ्यांसोबत खार पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. ते विख्यात गुन्हे क्षेत्रातील कायदेतज्ज्ञ आहेत.