शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Maharashtra Political Crisis: शिंदे गटातील संजय राठोडांना शह? उद्धव ठाकरे पोहरादेवीचे दर्शन घेणार! बंजारा समाजाला साद घालणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 15:48 IST

Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाळीनंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच राज्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या धक्क्यातून अद्यापही शिवसेना सावरताना दिसत नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकामागून एक बैठका घेत असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. यातच शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद दिल्याने विरोधकांकडून टीका होत असताना आता, उद्धव ठाकरे पोहरादेवीच्या दर्शनाला जाणार असल्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. 

शिवसेना पक्षात अभूतपूर्व फूट पडल्यानंतर पक्ष वाचवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरू आहेत. मागील काही निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिशी असणारा बंजारा समाज दुरावू नये यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पोहरादेवीमध्ये येण्याची शक्यता आहे. पोहरादेवीमध्ये उद्धव ठाकरे धर्मगुरु बाबुसिंग महाराज, महंतांची भेट घेण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि मंत्री संजय राठोड पोहरादेवीत आले होते. 

आदित्य ठाकरेंच्या वरळीत भाजपचे दहीहंडी उत्सवाचे आयोजन; मैदान बळकावले, अहिरांवरही मात

शिवसेनेतील फुटीनंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान पोहरादेवीला ते भेट देणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेचे मुंबईतील काही पदाधिकारी पोहरादेवीला दाखल झाले आहेत. पोहरादेवीच्या दर्शननंतर उद्धव ठाकरे हे रामराव महाराज स्मृतीस्थळ, संत सेवालाल महाराज, जगदंबा देवीच्या दर्शनाला उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वीच बंजारा समाजाचे नेते मंत्री संजय राठोड यांनी शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे आता बंजारा समाज शिवसेनेशी दूर जाऊ नये म्हणून स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पोहरादेवीत येणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, शिवसेनेतून बंड करून शिंदे गटात सामिल झालेले आमदार आणि विद्यमान मंत्री संजय राठोड हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातही मंत्री होते. मात्र, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. विरोधी पक्ष भाजपने या प्रकरणी अनेक आरोप केले होते. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपने स्थापन केलेल्या सत्तेत संजय राठोड पुन्हा एकदा मंत्री झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी बंजारा समाजाने मोर्चा काढला होता.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSanjay Rathodसंजय राठोडUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे