शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

सत्ता आल्यानंतर शिवसेनेकडून धमक्या; किरीट सोमय्यांचं राज्यपालांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 19:02 IST

किरीट सोमय्यांची शिवसेनेवर जोरदार टीका

मुंबई: भाजपाचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्यांनी शिवसेनेकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. याबद्दलचं पत्र त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि गृहसचिवांना दिलं आहे. मी कोणालाही घाबरत नाही. कोणाच्याही धमक्यांना भीक घालत नाही. मात्र शिवसेनेची दादागिरी रेकॉर्डवर यावी यासाठी राज्यपालांना आणि गृह सचिवांना पत्र दिल्याचं त्यांनी सांगितलं. दोन वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्यासारखाच हल्ला पुन्हा एकदा होऊ शकतो, अशी धमकी शिवसैनिकांकडून देण्यात आल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितलं. 'किरीट सोमय्याला कधी भीती वाटली नाही आणि यापुढेही वाटणार नाही. मी अनेकांचे भ्रष्टाचार आणि घोटाळे उघडकीस आणले आहेत. आता आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाऱ्यांविरोधात काम यापुढेही सुरुच राहील,'  असं सोमय्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं. सत्तेत आल्यानंतर लगेचच शिवसेनेची दादागिरी सुरू झाली आहे. त्यांनी धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. याबद्दलची नोंद कागदोपत्री व्हावी यासाठीच गृह सचिव आणि राज्यपालांना पत्र पाठवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. दोन वर्षांपूर्वी शिवसैनिकांनी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची आठवण त्यांनी करुन दिली. त्यावेळी दोन बस भरुन माणसं आली होती. त्यांच्या हल्ल्यात भाजपाच्या ७ महिला कार्यकर्त्या जखमी झाल्या होत्या. त्या जवळपास आठवडाभर रुग्णालयात होत्या, असं सोमय्या यांनी सांगितलं.  

शिवसेना आणि किरीट सोमय्या यांच्यामधील विळ्या भोपळ्याचं सर्वश्रुत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपाची युती तुटली होती. त्यावेळी सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली होती. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार चालतो, असे घणाघाती आरोप त्यांनी केले होते. उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर वांद्र्याचा माफिया अशी टीका केली होती. त्यानंतर सोमय्या आणि शिवसेना यांच्यातील दरी वाढत गेली. लोकसभा निवडणुकीवेळी शिवसैनिकांनी सोमय्यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला. यानंतर भाजपानं सोमय्यांचं तिकीट कापत मनोज कोटक यांना उमेदवारी दिली होती. 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याShiv SenaशिवसेनाBJPभाजपा