शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 11:18 IST

Sanjay Raut News: देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घ्यायची असेल, तर संकुचित वृत्ती सोडली पाहिजे, असा सल्ला संजय राऊतांनी दिला.

Sanjay Raut News: आमचे लोकसभेतील सगळे खासदार हे घट्ट आहेत. अडचणी काय आहे, तर विरोधी पक्षाच्या लोकांना महाराष्ट्रात अजिबात विकास निधी दिला जात नाही. हा एक राजकीय आणि सामाजिक अपराध आहे. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना कोट्यवधींचा निधी देतात. परंतु, लाखो लोकांनी निवडून दिलेल्या इतर खासदारांना निधीपासून वंचित ठेवतात. तुमच्या खिशातले पैसे आहेत का?, असा थेट सवाल ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला. 

राज्यात ऑपरेशन टायगर राबवून ठाकरे गटाचे खासदार फोडण्यासाठी पुन्हा प्रयत्न करण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या पक्षातील आठ खासदारांसोबत गुप्त बैठक केल्याच्या वृत्ताने महाराष्ट्रात राजकारणात खळबळ उडाली आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, संजय राऊत यांनी या प्रकरणी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना महायुतीवर निशाणा साधला.

फडणवीस हे शिंदे यांच्या पक्षाचे ऑपरेशन करत आहेत

ऑपरेशन जे असते ते एकदाच केले जाते. वारंवार एखाद्या शरीराचे ऑपरेशन होते, तेव्हा ते डेडबॉडीचे ऑपरेशन असते. देवेंद्र फडणवीस यांनी सध्या त्यांच्या पक्षाची डेडबॉडी केलेली आहे. सध्या जे ऑपरेशन सुरू आहे, ते देवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे करत आहेत. शिवसेनेचे नऊ खासदार एकत्र आहेत. मी काही नावे वाचली तर मला हसायला आले. उद्या माझे नाव टाकतील. आदित्य ठाकरे यांचेही नाव टाकतील. या प्रकारच्या बातम्या वातावरण गरम करण्यासाठी पेरल्या जात आहेत किंवा आम्ही काहीतरी घडामोडी करत आहोत, हे दाखवण्यासाठी केले जात आहे. हे चुकीचे आहे, असे सांगत संजय राऊतांनी हल्लाबोल केला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात राष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घ्यायची असेल, तर संकुचित वृत्ती सोडली पाहिजे. मी सगळ्यांचा आहे, मी लोकशाही तत्व मानतो. म्हणून विरोधी पक्षाचे आमदार, विरोधी पक्षाच्या खासदारांना समान न्याय देईन, अशी भूमिका स्वीकारली पाहिजे. तरच मोठी झेप घेता येईल. अन्यथा त्यांचे राजकीय अस्तित्व जोपर्यंत केंद्रात मोदी आहेत, तोपर्यंतच महाराष्ट्रात राहील, असा मोठा दावा संजय राऊतांनी केला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis targets Shinde's party; all MPs united: Sanjay Raut

Web Summary : Sanjay Raut claims Fadnavis is weakening Shinde's party. He alleges unequal fund distribution to opposition MPs. Raut asserts Shiv Sena MPs are united, dismissing rumors of defections as politically motivated attempts to create instability.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahayutiमहायुती