शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

“PM मोदी अन् CM शिंदेंचे पासपोर्ट जप्त करा, देश सोडून पळून जाणार आहेत”; राऊतांचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 10:24 IST

Sanjay Raut News: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. तो लढा आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

Sanjay Raut News: २०२४ पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्वांचे पासपोर्ट जप्त करा. कारण ते देश सोडून पळून जाणार आहेत आणि मी सांगतो ते घडते, असा मोठा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.  एका कार्यक्रमात बोलताना, ४ काय ४०० गुजराती येऊ द्या, एक शिवसैनिक त्यांच्यावर भारी पडेल. ही शिवसेना या महाराष्ट्राची आहे. मुंबईची रक्षक आहे, हे लक्षात ठेवा. आम्ही यांचा डाव हाणून पाडू, असा एल्गार संजय राऊत यांनी केला. 

जे जे महाराष्ट्राच्या वाटेत आडवे आले आहेत ते याच मातीत गाढले गेले आहेत. तसेच दोन गुजराती नक्कीच गाढले जातील. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानची सीमारेषा या आपल्या घरापर्यंत आली असती. आपले गुजराती माणसाशी भांडण नाही. आपले गुजरातचे भांडण नाही. पण आमच्या वाट्याचे उद्योग तिकडे नेण्याला आमचा विरोध आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले. 

शिंदे गटाला जनता माफ करणार नाही, गद्दारीला थारा नाही

शिवसेना सोडून गेलेल्यांना गाडून छातीवर शिवसेनेचा झेंडा फडकावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देताना, शिंदे गटाला जनता माफ करणार नाही. गद्दारीला थारा नाही. ४० आमदारांना जनता धडा शिकवेन. त्यांना घरात बसवेल. कायद्याचा लढा त्यांच्या विरोधात आहे. महाराष्ट्र तोडण्याचे, महाराष्ट्राला कमजोर करण्याचे काम केले जात आहे. बाळासाहेब असते तर असे करण्याची हिंमत कुणाची झाली नसती. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. तो लढा आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत, या शब्दांत संजय राऊत यांनी आव्हान दिले. 

दरम्यान, सामना रोखठोक सदरातूनही संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. देशात निवडणूक आयोग हा आज मोदी-शहा निवडणूक आयोग बनला आहे. सर्व घटनात्मक संस्थांचे खच्चीकरण सुरू आहे. त्यातून निवडणूक आयोगही सुटला नाही. पंतप्रधान बजरंग बलीच्या नावाने मते मागतात. अमित शहा मध्य प्रदेशातील मतदारांना मोफत अयोध्यावारीचे प्रलोभन दाखवतात. पुलामातील जवानांचे हौतात्म्य हा प्रचाराचा मुद्दा भाजपकडून होतो. हे गंभीर आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदी