शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

फक्त ‘टोमणे’च असे भारी असतील तर...; उद्धव ठाकरेंच्या भाषणावरून शिवसेनेचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 07:55 IST

अंगावर येऊ नका, दिल्लीतील सत्तेचा माज दाखवू नका, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी देऊन भाजपला व त्यांच्या बगलबच्च्यांना पायाखाली घेतले आहे.

मुंबई - शिवसेनेच्या राजकीय विरोधकांचे आकलन कमी पडत असल्याने शिवसेनेच्या बाबतीत त्यांचे अंदाज रोजच चुकत आहेत. मुंबईतील महाप्रचंड सभेने तर या सगळ्या विरोधकांनी मातीच खाल्ली आहे. सभेतील गर्दी पाहून शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हेसुद्धा उसळून बोलले व त्यांच्या प्रत्येक फटकाऱ्यासरशी विरोधकांचे एक-एक दात घशात गेले. फडणवीसादी भाजपचे पुढारी या सभेची तुलना ‘टोमणे सभा’, ‘टोमणे बॉम्ब’ अशीच करत होते. एकवेळ ते खरे मानू. ठाकऱ्यांचे फक्त ‘टोमणे’च असे भारी असतील तर प्रत्यक्ष घाव, फटके व हल्ले किती भयंकर असतील? उद्धव ठाकरे यांनी फणस सोलावा तसे विरोधकांना सोलून काढले आहे असा टोला सामना अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपाला लगावला आहे.

तसेच भाजपचे(BJP) पुढारी देशभरात इतरांना ‘बुस्टर’ डोस देत फिरत असतात, पण मुंबईतील शिवसेनेच्या सभेने या मंडळींना जहाल बुस्टर डोस देऊन उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा बाणा दाखवून दिला. मुंबई स्वतंत्र करण्याची भाषा मधल्या काळात फडणवीसादी नेत्यांनी केली. शिवसेना व मराठी माणूस भाजपचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, अशी हाळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. अंगावर येऊ नका, दिल्लीतील सत्तेचा माज दाखवू नका, असा इशारा ठाकरे यांनी देऊन भाजपला व त्यांच्या बगलबच्च्यांना पायाखाली घेतले आहे. शिवसेनेला(Shivsena) कमी लेखण्याचे व खाली खेचण्याचे धाडस अंगलट येईल, हाच शिवसेनेच्या वादळी सभेचा इशारा आहे असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

तुमच्या सत्तेचा ‘ढाचा’ आम्ही खाली खेचणार; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

मुंबईतील शिवसेनेची सभा दिमाखात झाली. शिवसेनेच्या सभांना होणाऱ्या गर्दीची आकडेमोड आजपर्यंत कोणालाच जमली नाही. बीकेसीतील खुल्या मैदानावरील सभेची सुरुवात वांद्रय़ातून होती, तर दुसरे टोक कुर्ल्याच्या पार गेले होते. त्यामुळे विरोधी पक्षातील गर्दी पंडितांचीही वाचा गेली आहे.

सभेची गर्दी ही फक्त त्या मैदानावरच नव्हती. सभास्थानी लाखो लोक होते, तेवढेच लोक बाहेर अडकून पडले होते व आसपासच्या रस्त्यांवर गर्दीच्या वादळी लाटा जणू उसळत असल्याचे वर्णन प्रसिद्ध झाले ते खरेच आहे. शिवसेना पूर्वीची राहिली नाही, असा अपप्रचार करणाऱ्यांच्या जिभा हा महासागर पाहून टाळूलाच चिकटल्या असतील.

कश्मीरात सध्या हिंदू पंडितांवरच नव्हे, तर देशभक्त नागरिकांवर अतिरेक्यांचे अमानुष हल्ले सुरू झाले आहेत. राहुल भट्ट या कश्मिरी पंडित तरुणावर दहशतवाद्यांनी सरकारी कार्यालयात घुसून हल्ला केला व ठार मारले. त्यानंतर कश्मीरातील हिंदू समाज रस्त्यावर उतरला.

पोलिसांनी हिंदूंवर अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. हिंदू समाजाने मोदी व शहांच्या विरोधात घोषणा दिल्या. उद्धव ठाकरे यांनी या परिस्थितीवर केला, ‘‘राहुल भट्टला जिथे मारले तिथे आता ‘हनुमान चालिसा’ वाचायची काय?’’

“पुढची २५ वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा; शाखेत बसा, लोकांच्या समस्या ऐका”: उद्धव

कंगना राणावतपासून नवनीत राणापर्यंत सर्वांना केंद्र सरकारने एकदम खास सुरक्षा पुरवली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे तर केंद्रीय सुरक्षा व्यवस्थेचा ‘सेल’ लागला आहे किंवा काळा बाजारच सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विरोधात अनापशनाप बोला व केंद्रीय सुरक्षेचे खास पथक मिळवा, असे ‘पॅकेज’ लावले आहे.

महाराष्ट्रात अनेक टिनपाट लोकांना केंद्राने सुरक्षा पुरवली ही गंमतच आहे, पण कश्मीरात राहुल भट्टसारख्या लोकांना कोणतीही सुरक्षा नाही व ते दिवसाढवळय़ा मारले जात आहेत. उद्धव ठाकरे यांचा हा मुद्दा बिनतोड आहे. भगवी टोपी घालणाऱ्यांना तुम्ही प्रखर हिंदुत्ववादी मानता. मग आरएसएसची टोपी काळी कशी? या प्रश्नावर आता संघाला खुलासा करावा लागेल.

फक्त 13 वर्षांच्या देवेंद्र फडणवीस यांनी राममंदिराच्या आंदोलनात कसा काय सहभाग घेतला? या ढोंगाचा मुखवटाच ठाकरे यांनी फाडला. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून भाजप राजकीय विरोधकांना नामोहरम करीत आहे. खोटय़ा मार्गाने आमच्या मागे लागणार असाल तर तुम्हालाही दया-माया-क्षमा दाखविणार नाही. महाराष्ट्रातून पळता भुई थोडी करीन असा दम ठाकरे यांनी भरला.

जे विरोधात आहेत ते सगळे भाजपच्या दृष्टीने गुन्हेगार कसे? मग भाजपमध्ये कोण आहेत? सध्या दाऊदच्या नावाने राजकारण सुरू आहे, पण उद्या दाऊद म्हणाला, मीच भाजपमध्ये येतो तर तो लगेच शुद्ध होईल व मंत्री म्हणून भाजप नेत्यांच्या मांडीस मांडी लावून बसलेला दिसला तरी आश्चर्य वाटायला नको अशा अस्वली गुदगुल्या ठाकरे यांनी भाजपास केल्या. त्यामुळे संपूर्ण सभेत हास्यस्फोटच घडले.

भारतीय जनता पक्ष व त्यांचे पूर्वाश्रमीचे बाप ‘जनसंघ’ वगैरे स्वातंत्र्य लढय़ात कधीच नव्हते. मुंबई, महाराष्ट्राच्या युद्धातूनही त्यांनी पळ काढला. अशा लोकांनी शिवसेनेला किंवा महाराष्ट्राला काही शिकविण्याच्या फंदात पडू नये.

राज ठाकरे वगैरे नेत्यांच्या मेंदूचा केमिकल लोचा झाला असल्याची चपखल उपमा त्यांनी दिली. राज ठाकरे यांचे राजकारण भरकटल्याप्रमाणे झाले आहे व भाजप त्यांचा वापर करून घेत आहे. आपल्यात बाळासाहेब ठाकऱ्यांचा संचार झाल्याचा आव आणून ते वागतात. यामागे भाजपची खेळी आहे. फाटक्या टय़ूबमध्ये अशी हवा भरल्याने हिंदुत्वाचा वारू कसा उधळणार? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.

देशात महागाई, बेरोजगारीचा आगडोंब उसळला आहे. मोदी धान्य फुकट देतात, पण गॅसच्या किमती हजारावर गेल्या. त्यामुळे अन्न शिजवायचे कसे? त्या महागाईवर बोलायचे की भोंगे आणि ‘हनुमान चालिसा’वर वाद करायचा? हिंदुत्वाची ठेकेदारी काही भाजपने घेतलेली नाही.

भाजपचे हिंदुत्व विषारी, विखारी आणि विकृत असल्याचा घणाघात ठाकरे करतात, तेव्हा यापुढे शिवसेना-भाजपचे नाते काय असेल याचा खुलासा होतो. मोदी-शहांच्या बाबतीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी परखड भूमिका मांडली व ती मांडणे आवश्यक होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा