Devendra Fadnavis: तुमच्या सत्तेचा ‘ढाचा’ आम्ही खाली खेचणार; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 05:16 AM2022-05-16T05:16:38+5:302022-05-16T05:17:27+5:30

Devendra Fadnavis: वाघाचे फोटो काढून वाघ होता येत नाही. निधड्या छातीने संकटांचा मुकाबला करावा लागतो, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

bjp devendra fadnavis replied shiv sena chief and cm uddhav thackeray in mumbai sabha | Devendra Fadnavis: तुमच्या सत्तेचा ‘ढाचा’ आम्ही खाली खेचणार; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर

Devendra Fadnavis: तुमच्या सत्तेचा ‘ढाचा’ आम्ही खाली खेचणार; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई: मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची कुणाच्या बापाची औकात नाही. पण होय, आम्हाला मुंबई वेगळी करायची आहे ती शिवसेनेच्या अनाचारापासून, अत्याचारापासून अन् भ्रष्टाचारापासून. तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा खाली खेचल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा रविवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बीकेसी येथील भाषणात भाजपवर हल्ला चढविताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. ठाकरेंच्या आरोपांना रविवारी देवेंद्र फडणवीस यांनी गोरेगाव येथील हिंदी भाषिक संमेलनातील भाषणाने उत्तर दिले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवत फडणवीस म्हणाले की, सहल म्हणून नाही तर संघर्षासाठी अयोध्येला गेलो. कारसेवा केली. आम्ही कधी फाइव्ह स्टारचे राजकारण केले नाही. गोळ्या चालताना पाहिले, लाठ्या खाल्ल्या म्हणून इथवर पोहोचलो. तुमच्यासारखा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही. मुख्यमंत्र्यांनी माझ्या वजनाचा उल्लेख केला. पण, एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझे राजकीय वजन कमी करू शकत नाही. तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा खाली आणल्याशिवाय राहणार नाही. वजनदार लोकांशी सांभाळून राहा, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

वाघाचे फोटो काढून वाघ होता येत नाही  

वाघाचे फोटो काढून वाघ होता येत नाही. निधड्या छातीने संकटांचा मुकाबला करावा लागतो. आजवर तुम्ही कोणता संघर्ष केला, कुठल्या आंदोलनात तुम्ही होतात, असा प्रश्न विचारतानाच दोन वर्षे कोरोनाच्या संघर्षातही मुख्यमंत्री फक्त फेसबुक लाइव्ह करीत होते, अशी टीका फडणवीस यांनी केली.

सांगायला कोणता मुद्दा नसला की लगेच मुंबई तोडण्याचे षड्यंत्र वगैरे भाषा सुरू करतात. मात्र, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची कोणाच्या बापाची औकात नाही. जनसंघ हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात होता. थोडा इतिहासाचा अभ्यास करा. - देवेंद्र फडणवीस
 

Web Title: bjp devendra fadnavis replied shiv sena chief and cm uddhav thackeray in mumbai sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.