Shiv Sena is soft ... Sambhaji Brigade hot | शिवसेना नरम तर... संभाजी ब्रिगेड गरम

शिवसेना नरम तर... संभाजी ब्रिगेड गरम

ठळक मुद्दे- महसुलमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते होणार कार्तिक यात्रेची शासकीय महापूजा- शिवसेनेने मंगळवारी प्रसिध्दीपत्रकाव्दारे महसुलमंत्र्यांना केला होता विरोध- आता संभाजी ब्रिगेडने महसुलमंत्र्यांना विरोध असल्याचे सांगितले

 

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजेचा मान चंद्रकांत पाटील यांना देण्यावरून शिवसेना नरम तर संभाजी ब्रिगेड गरम असल्याचे दिसत आहे.

कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजा महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी करु नये. अन्यथा महसुलमंत्र्यांना शिवसेना विरोधाला सामारे जावे लागेल. असा इशारा प्रसिद्धीपत्रकाद्वारे शिवसेनेचे तालुका संघटक संदीप केंदळे यांनी मंगळवारी जाहीर केले होते. मात्र यांचा आक्षेप घेत ते व्यक्तीगत मत असल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी केले आहे. त्याचबरोबर शिवसेनेतर्फे  चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करणार असल्याचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी सांगितले. यामुळे शिवसेना नरमले चे दिसत आहे. 

मात्र अध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे पुणे विभाग किरणराज घाडगे यांनी चंद्रकांत पाटलांनी विठ्ठलाची महापूजा करू नये असा आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील यांना पूजेला येताना विरोधाला सामोरे जावे लागणार आहे. हे मात्र नक्की असल्याचे दिसून येत आहे.


 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shiv Sena is soft ... Sambhaji Brigade hot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.