शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

"पवारांवर टीका करणाऱ्यांनी आपली लायकी काय, त्याचं आत्मरीक्षण आधी करावं"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 8:59 AM

गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर केलेल्या टीकेचा सामनामधून समाचार

ठळक मुद्देपडळकर यांच्या पवारांवरील वादग्रस्त विधानाचा शिवसेनेकडून जोरदार समाचारविरोधी पक्षाचं राजकारण म्हणजे कोरोनापेक्षा भयंकर गजकर्ण असल्याची टीकापडळकरांमुळे भाजपावर गावोगावी जोडे खाण्याची वेळ; शिवसेनेचा हल्लाबोल

मुंबई: भाजपाचं सध्याचं राजकारण म्हणजे कोरोनापेक्षा भयंकर गजकर्ण असल्याची टीका सामनामधून करण्यात आली आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अनुद्गार काढले. त्यावरून शिवसेनेनं पडळकर यांचा समाचार घेतला आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्ष गजकर्ण खाजवण्याचे काम करत आहे. त्यामुळे गावोगाव जोडे खाण्याची वेळ भाजपवर आली. हे सुधारणार कधी तेच कळत नाही, अशा शब्दांत भाजपाला लक्ष्य करण्यात आलं आहे.'गोपीचंद जासूस नावाचा हिंदी सिनेमा पूर्वी येऊन गेला. या गोपीचंदाच्या अनेक करामती पडद्यावर दिसल्या. भारतीय जनता पक्षाने त्यांच्या राजकीय पडद्यावर नवा गोपीचंद आणला असून या गोपीचंदच्या करामतींमुळे भाजपवर गावागावात चपलांचा प्रसाद खाण्याची वेळ आली आहे. एकनाथ खडसे यांना मागे ठेवून देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना आमदार केले त्या गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर फार घाणेरड्या शब्दांत भडास व्यक्त केली आहे व त्याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. भाजपचे गोपीचंद हे काही राजकारण किंवा समाजकारणातले महान व्यक्तिमत्त्व नाही, पण देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजातील एक धडपड्या तरुण म्हणून त्यांना भाजपच्या सोयीसाठी वापरले आहे. त्यामुळे गोपीचंद महाशयांनी पवारांबाबत जे घाणेरडे वक्तव्य केले ते फडणवीस किंवा त्यांच्या भाजपची 'मन की बात' तर नाही ना, अशी शंका घेण्यास वाव आहे,' अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याच्या गुळण्या गोपीचंदने टाकल्या. 'श्री. पवार यांनी बहुजन समाजावर नेहमीच अन्याय केला असून छोट्या समूहांना भडकवायचे आणि लढवायचे हे धोरण राबविले', असे हे गोपीचंद महाशय म्हणतात. 'पवारांकडे विचारधारा नाही, व्हिजनही नाही आणि अजेंडा नाही', असे मनाचे श्लोकही गोपीचंद यांनी म्हटले आहेत. गोपीचंद यांनी ही जी विधाने पवारांबाबत केली ती भाजपच्या काही नेत्यांनी अधूनमधून केलीच आहेत. गोपीचंद हे राजकारणामधील कच्चे मडके आहे हे माहीत होते, पण कच्चे मडके फुटकेदेखील आहे हे आता सिद्ध झाले,' अशा शब्दांत पडळकर आणि भाजपाचा समाचार घेण्यात आला आहे.'पडळकर यांनी पवारांबाबत केलेली विधाने वादग्रस्त आहेत. पवारांची ज्येष्ठता, अनुभव, व्यासंग, समाजकारण याचा गौरव पंतप्रधान मोदी यांनीही अनेकदा केला आहे. पवार यांना महाराष्ट्रात आणि देशात मोठा मान आहे. पवार हे आपले गुरू असल्याचे मोदी यांनी न डगमगता सांगितले आहे. गोपीचंद हे आज भाजपच्या बिळात शिरले आहेत. बिळातला बिनविषारी साप जोरात डंख मारतो तसे पडळकरांनी केले. पडळकरांनी सांगलीमध्ये भाजपविरोधात निवडणूक लढवली. 'भाजपला मत देऊ नका. मी भाजपसाठी कधी मत मागायला आलो तर जोड्याने मारा मला,' असे हेच पडळकर तेव्हा सांगत. पुढे हेच पडळकर भाजपमध्ये आले व बारामतीत अजित पवारांच्या विरोधात भाजपचे उमेदवार झाले. पण बारामतीत धनगर समाज मोठ्या प्रमाणात असूनही पडळकरांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यामुळे या महाशयांचा अजेंडा, व्हिजन वगैरेबाबत गोंधळ आहे. पवार हे धनगर आरक्षणावर पॉझिटिव्ह नाहीत हा गोपीचंद यांचा आक्षेप आहे. यात पवारांचा संबंध येतोच कुठे? हा फैसला फडणवीस सरकारने करायचा होता. 2014 मध्ये फडणवीस सरकार आलेच हेते व धनगर आरक्षणाचा ठराव पहिल्याच कॅबिनेटमध्ये करू असे वचन भाजपचेच होते, हे गोपीचंद कसे विसरले?', असा सवाल सामनामधून उपस्थित करण्यात आला आहे.'कोणताही अभ्यास, संदर्भ, जनमत पाठीशी नसलेले लोक भाजपने भरती करून स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे ती अशी! शरद पवार यांच्याबाबत राजकीय मतभेद असू शकतात. त्यांच्यावर टीकाटिप्पणी होऊ शकते. लोकशाहीत हे स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे, पण पवारांसारख्या ज्येष्ठांवर अशा घाणेरड्या शब्दांत टीका करणार्‍यांनी स्वतःचे पाय कोठे आहेत, आपली लायकी काय याचे आत्मपरीक्षण आधी करावे,' अशा आक्रमक भाषेत सामनानं भाजपाला लक्ष्य केलं आहे. 'पवारांनी बहुजन समाजातील अनेक तरुणांना राजकारणात पुढे आणले. तसे नसते तर दिवंगत आर.आर. पाटील तसेच जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे ही नावे राजकारणात तळपताना दिसली नसती. पवारांच्या मंत्रिमंडळाचा तोंडवळा हा बहुजनांचाच राहिला. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी तळागाळातील बहुजन समाजाला राजकारणात मानाचे पान दिले. त्यामुळे 60 ते 70 वर्षांत पवारांनी बहुजन समाजाला झुलवत ठेवले अशी वाचाळकी करणे हे मूर्खाचे लक्षण तर आहेच, पण मनाला कोरोना झाल्याचीही लक्षणे आहेत. त्यामुळे गोपीचंद यांची मानसिक अवस्था समजून घेतली पाहिजे. गोपीचंद पडळकर यांच्या विधानाशी भाजपचा संबंध नाही असा साळसूदपणाचा आव आता भाजपने आणला. हे सगळ्यात मोठे ढोंग आहे. मोदी यांच्यावर टीका करणार्‍यांना हे लोक देशद्रोही ठरवतात आणि पवारांवर तशीच टीका करणार्‍यांपासून मात्र स्वतःला झटकतात,' अशा शब्दांमध्ये भाजपावर तोंडसुख घेण्यात आलं आहे. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरBJPभाजपाSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीShiv Senaशिवसेना