शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

चांदमिया पाटील, तुम्ही छाती फाडण्याची गरज नाही; शिवसेनेचा 'राम'बाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 07:47 IST

मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या भेटीवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांचा शिवसेनेकडून समाचार

मुंबई: मुख्यमंत्री अयोध्या भेटीवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांचा शिवसेनेनं सामनातून समाचार घेतला आहे. तुमच्या छातीत खरंच राम असेल तर छात्या बडवणे बंद करा. श्रीरामाला त्रास होईल, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. माझी छाती फाडली तर त्यात श्रीराम दिसतील, असं म्हणणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख चांदमियां पाटील असा करण्यात आला आहे. चांदमियां पाटील यांच्या छातीची तातडीने तपासणी करण्यात यावी, असा चिमटा शिवसेनेनं काढला आहे. चांदमियांनी त्यांची छाती फाडण्याची गरज नाही. त्यांच्या छातीत हिंदुत्वाच्या बाबतीत किती काळेकुट्ट विष ठासून भरले आहे याचा अनुभव शंभर दिवसांपूर्वी महाराष्ट्राने घेतला आहे. राम समजायला सत्यवचन व माणुसकी समजून घ्यावी लागते. राज्यातील विरोधकांकडे त्याची वानवा आहे. म्हणूनच 'ठाकरे सरकार'च्या अयोध्यावारीवर ते छात्या बडवीत आहेत, अशी टीका शिवसेनेनं केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अयोध्या यात्रा यथासांग पार पडली. त्यामुळे महाराष्ट्रातील उठवळ विरोधकांचे पोटविकार बळावल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांनी ठाकरे सरकारच्या अयोध्या यात्रेवर फालतू टीका-टिपणी सुरू केली. त्यात त्यांचेच तोंडात लपवलेले राक्षसी सुळे जनतेला दिसत आहेत. उद्धव ठाकरे हे अयोध्येस गेले, ते तिथे प्रथम गेले काय? राज्यात फडणवीसांचे व केंद्रात मोदींचे सरकार असताना उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचा मोठा फौजफाटा घेऊन अयोध्येस जाऊन आले, दर्शन घेतले होते तसेच शरयूच्या तीरी त्यावेळी भव्य महाआरती केली होती. तोपर्यंत ठाकरे हे हिंदुत्ववादी होते. मात्र आता महाराष्ट्रातील भाजपवाल्यांना हे ढोंग वाटत आहे. शिवसेनेचे हिंदुत्व एखाद्याला ढोंग वाटणे हेच खरं तर ढोंग आहे. तसे ढोंग राज्यातील भाजपवाले करीत आहेत, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपाचा समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाला पूर्वीइतकेच घट्ट पकडून आहेत, काँग्रेसच्या सोबत राहूनही त्यांनी हिंदुत्वाच्या दुधात मिठाचा खडा पडू दिला नाही याच पोटदुखीने राज्यातील विरोधक बेजार झाले आहेत. दिल्लीप्रमाणे नागरिकता कायद्यावर महाराष्ट्रात हिंसा व्हावी असे राज्यातील ठाकरे विरोधकांना वाटत होते, पण उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या पोटदुखीवर असा इलाज केला की, राज्यात साधी ठिणगीही पडू दिली नाही. ही सर्व वाडवडिलांची पुण्याई, छत्रपतींचे आशीर्वाद आणि श्रीरामाचा प्रसाद आहे. त्याच भावनेतून मुख्यमंत्री ठाकरे हे अयोध्येत जाऊन श्रीरामचरणी नतमस्तक झाले. मुख्यमंत्री तिथे गेले व दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या खिशात हात घातला व राममंदिरासाठी एक कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. अयोध्येत भव्य राममंदिर निर्माण कार्य सुरू होईल व पहिला धनादेश 'ठाकरे सरकार'ने दिला याची इतिहासात नोंद राहील. अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. यात राज्यातील विरोधकांच्या पोटात कळा याव्यात असे काय आहे? हे ऐकून त्यांनी खूश व्हायला हवे होते, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपा नेत्यांना लक्ष्य केलं आहे. चांदमियां पाटील वगैरेंच्या छातीत राम आहे. मग इतरांना काय छात्या नाहीत? पण बहकलेला, निराश झालेला विरोधी पक्ष काय बोलतो आणि कसा वागतो ते त्यांनाच माहीत! ''शिवसेनेने भाजपचा त्याग केलाय, हिंदुत्वाचा नाही.'' या एका ठोशाने उद्धव ठाकरे यांनी सगळय़ांचेच दात घशात घातले. हा ठोसा मारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जागा निवडली ती अयोध्येची. अयोध्या म्हणजे कुणा एखाद्याची मक्तेदारी नाही. कुणी सरकार स्थापनेसाठी इकडे गेला काय, किंवा तिकडे गेला काय? रामावर ज्यांची श्रद्धा त्या सगळय़ांचीच अयोध्या. कैकयीमुळे श्रीराम वनवासात गेले, पण तिचा पुत्र भरत हा रामभक्त होता. तशी विचारधारा कुठलीही असली तरी ती रामभक्तीआड येऊ शकत नाही. पुन्हा फक्त वाल्याचे वाल्मीकी बनविण्याचे वॉशिंग मशीन राजकारणात आणले म्हणजे 'रामायण' समजले असे होत नाही, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याchandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv SenaशिवसेनाBJPभाजपा