शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

“संजय राऊतांमुळे शरद पवारांनी ठाकरे गटाला आपलेसे केले, आता ही अवस्था झाली”; शिंदे गटाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 15:20 IST

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: शिवसेना आणि भाजपा युती मजबूत आहे. मुख्यमंत्री बदलले जाणार नाहीत. मुख्यमंत्री खंबीर आहेत, असे शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आले.

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: शिवसेना आणि भाजपा युती मजबूत आहे. मुख्यमंत्री कुठेही बदलले जाणार नाहीत. मुख्यमंत्री खंबीर आहेत. चोवीस तास काम करणारा हा मुख्यमंत्री आहेत. मराठा आंदोलन असो किंवा ओबीसी आंदोलन असो ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या समर्थपणे सांभाळली, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितले.

मीडियाशी बोलताना पुणे पोर्शे कार अपघातावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, पुणे हीट अँड रन प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. जनतेचा संताप पाहून राजकारण तापले आहे. पोलिसांवर दबाव आहे. त्यामुळे विरोधक ज्या प्रकारे आरोप करत आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण होत आहेत. पल्लवी सापळे यांच्यासंदर्भात आरोप असतील. तर त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. पण ती व्यक्ती जर सक्षम असेल तर त्यांची चौकशी करण्यासाठी नियुक्ती केली असेल. आरोप करणे आणि तो सिद्ध होणे यात अंतर आहे, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.

मुख्यंत्री एकनाथ शिंदे अन् गजानन किर्तीकर भेटतील आणि निर्णय घेतील

आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, आमच्याकडे असलेल्या जागा आणि अजित पवार यांच्याकडे असलेल्या जागा वाटप सन्मानजनक होईल. तसेच गजानन किर्तीकर यांच्या वक्तव्यांनी शिवसैनिक नाराज आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गजानन किर्तीकर भेटतील आणि निर्णय घेतील, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, शरद पवारांनी ठाकरे गटाला आपले केले. त्याला कारणीभूत संजय राऊत आहेत. शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे. त्यासााठीच ते एव्हढे ॲक्टिव्ह आहेत. अमित शाह हेच सांगत आहेत की, शरद पवारांनी जी गुगली टाकली, त्यामुळे ठाकरे गटाची ही अवस्था झाली आहे, असे टीका संजय शिरसाट यांनी केली. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Sanjay Shirsatसंजय शिरसाटSanjay Sirsatसंजय सिरसाटShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुती