शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 18:09 IST

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: गेली ३६ वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक म्हणून संजय पवार यांची ओळख आहे. पक्षातून सातत्याने होत असलेल्या अवहेलनेमुळे ते काहीसे अस्वस्थ असल्याचे म्हटले जात आहे.

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला पडलेले खिंडार अधिकच विस्तारत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते पक्ष सोडून जात असताना, ठाकरे गटातीलच अनेक जण नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोल्हापूर येथील ठाकरे गटातील बडे नाव उपनेते, माजी जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, शिवसेना शिंदे गटातील एका नेत्यांनी संजय पवार यांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिली आहे.

विधानसभा निवडणुकीपासून जिल्हाप्रमुख नेमणुकीपर्यंत पक्षाने विश्वासात घेतले नसल्याने राजीनामा देत असलो, तरी गेली ३६ वर्षे ‘मातोश्री‘वर श्रद्धा ठेवून काम केले. येथून पुढे शेवटचा श्वास असेपर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सेवक म्हणून काम करणार आहे. गेली ३६ वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक म्हणून पवार यांची ओळख आहे. पक्षातून सातत्याने होत असलेल्या अवहेलनेमुळे ते काहीसे अस्वस्थ होते. पत्रकार परिषदेत भूमिका जाहीर करताना त्यांना अश्रू अनावर झाले. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी संजय पवार यांच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया देताना सूचक भाष्य केले.

संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू

पत्रकारांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, संजय पवार हे सच्चे शिवसैनिक आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे संघटन कौशल्य आहे. अशा व्यक्तीवर अन्याय करणे, अप्रत्यक्षपणे त्यांना तुम्ही निघून जा, असे सांगणे योग्य नाही. अजून आमची संजय पवार यांच्याशी चर्चा झालेली नाही. पण, संजय पवार यांच्यासारखी एखादी चांगली व्यक्ती आम्हाला मिळत असेल आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत येत असतील, तर नक्कीच आम्ही त्यांचे स्वागत करू. प्रत्येक वेळी जातात त्यांना जाऊ दे म्हणायचे, बाकीच्यांचा अपमान करायचा, त्यांची बदनामी करायची. त्या लोकांना नावे ठेवायची, हाच उद्योग त्यांचा सुरू असतो. म्हणूनच ठाकरे गटातील सर्व मंडळी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेत आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, उद्धवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी पक्षातील अनेकजण इच्छुक होते. संजय पवार यांनी इच्छुकांची नावे पक्षप्रमुखांना अनेक वेळा पाठवली होती. पण, शुक्रवारी माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांचे नाव जाहीर केल्याने पक्षात असंतोष निर्माण झाला. त्यातून युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख हर्षल सुर्वे यांनी राजीनामा दिला. सामान्य शिवसैनिक ते उपनेते पद देत असताना आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे उपाध्यक्षपद, राज्यसभेची उमेदवारी देऊन सन्मान केला. पक्षाने आपणाला खूप दिले, पण ज्या पध्दतीने निर्णय घेताना पक्षाकडून वागणूक मिळते, त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंतSanjay Pawarसंजय पवारPoliticsराजकारण