शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “इथे फक्त शिवसेना, महाराष्ट्रातील जनता शिंदे गटाला मानत नाही”; युवासेनेतील नेत्याने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 16:14 IST

Maharashtra Political Crisis: गाव तिथे शाखा ही संकल्पना राबवत राज्यात उद्धव ठाकरेंच्या पाठीशी मोठी ताकद उभी करेन, असा निर्धार युवासेनेतील नेत्याने व्यक्त केला आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) राज्यभरातून वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. यातच पडत्या काळात पक्षाची बाजू लावून धरणाऱ्या युवासेनेच्या एका नेत्याने शिंदे गटाला पुन्हा एकदा लक्ष्य केले असून, इथे फक्त आणि फक्त शिवसेना आहे, या शब्दांत सुनावले आहे. 

युवा नेते शरद कोळी यांची युवासेनेच्या राज्य विस्तारकपदी निवड झाल्यानंतर त्यांनी युवासेनेच्या बैठकांचा सपाटा सुरु केला आहे. सोलापूर शहरातील शासकीय विश्रामगृहात शरद कोळी यांच्या अध्यक्षतेखाली युवासेनेची बैठक पार पडली. यावेळी इथे शिवसेनेत कुठला गट-फिट काय नाही. फक्त शिवसेना आहे. उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून शिंदेंनी आपला गट स्थापन केला आहे. महाराष्ट्रातील जनता ही शिंदे गटाला मानत नाही, या शब्दांत कोळी यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. 

आदित्य ठाकरेंच्या पाठीशी मोठी ताकद उभी करेन

सत्तेसाठी शिवसेनेसोबत गद्दारी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर जाणे पसंत केले. या गद्दारांच्या मानगुटीवर शिवसेना बसणार आहे. त्यांची औकात दाखवणार आहे, अशी बोचरी टीका शरद कोळी यांनी शिंदे गटावर केली. आदित्य ठाकरेंनी माझ्यावर युवासेना राज्य विस्तारकपदाची जबाबदारी सोपवली आहे. गाव तिथे युवासेनेची शाखा ही संकल्पना राबवत राज्यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या पाठीशी मोठी ताकद उभी करेन, असा निर्धार कोळी यांनी यावेळी व्यक्त केला. 

दरम्यान, शिवसेना संकटात असताना उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचा इराद्याने शिवसेनेचा भगवा हाती घेतलेल्या सोलापूरच्या शरद कोळी यांच्यावर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मागील पंधरा दिवसांपूर्वी मोठी जबाबदारी सोपवली. शरद कोळी यांच्या खांद्यावर आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या राज्य विस्तारकपदाची धुरा सोपवली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर युवा नेते शरद कोळी यांनी बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन मोठे शक्तिप्रदर्शन केले. त्याच कामावर खूश होऊन आदित्य ठाकरे यांनी कोळींवर विशेष जबाबदारी सोपवली आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAaditya Thackerayआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना