शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
9
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
10
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
11
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
12
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
13
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
14
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
16
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
17
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
18
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
19
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
20
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!

भाडोत्री भोंगे अन् लाऊडस्पीकर यात फरक; संजय राऊतांचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 12:05 IST

आमच्या लाऊडस्पीकरसोबत तुमच्या पिपाण्या टिकणार नाही. ज्यापद्धतीने उद्धव ठाकरे सरकार घालवण्याचा प्रयत्न झाला. पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे तुम्ही आम्हाला सत्य, न्यायाच्या गोष्टी सांगू नका अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपावर टीका केली आहे.

मुंबई - आम्ही लाऊडस्पीकरवरून सरकार पडण्याच्या तारखा देणार नाही. भाजपाच्या पिपाण्या वाजत होत्या. हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. सरकार मजबूत पायावर नाही. कुणाला सनईचौघडे वाजवायचे वाजवू द्या. भाडोत्री भोंगे आणि लाऊडस्पीकरमध्ये फरक आहे. शिवसेनेचा लाऊडस्पीकर ५६ वर्ष सुरू आहे. आमचा लाऊडस्पीकर महाराष्ट्रातील जनतेचा आवाज आहे. या लाऊडस्पीकरवरील गर्जना ऐकण्यासाठी लोकं शिवसेनेच्या मागे उभे आहेत असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात ज्यांनी चोऱ्यामाऱ्या करून सरकार स्थापन केले त्यांच्या छातीत धडकी भरवणारी गर्दी आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेत दिसत आहे. राज्यभरात उदंड प्रतिसाद मिळत आहे. शिवसैनिकांच्या अश्रूत हे सरकार वाहून जाईल. अंतर्हकलहाने हे सरकार पडेल. एक महिन्यानंतरही तुम्ही हम दोनो एक दुजे के लिए या सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये अडकून पडलाय. किती वेळा दिल्लीला जाणार? शिवसेना संभाजीनगरमध्ये दिसली ती सत्तेत असणारी नाही. आधी सरकार स्थापन करा मग बोला असं त्यांनी सांगितले. 

तसेच भाजपात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. त्यात चंद्रकांत पाटील यांनी विधान केले त्याचे स्वागत करतो. जे पोटात मळमळत होते ते ओठावर आले. ही भाजपाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. या भावनेचा आदर व्हायला हवा. शिवसेना मराठी माणसाची भूमिका मांडत राहीन. सकाळी ९ नव्हे तर २४ तास मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील. प्रत्येक शिवसैनिकांचा आक्रोश, घराघरातील महिलेचा हुंकार हा लाऊडस्पीकर तुम्हाला बधिर केल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर कुठलीही कारवाई करा. तुमची सगळी कारस्थाने मला माहिती आहे. मी कारवाईला सामोरं जायला तयार आहे असा इशारा संजय राऊतांनी भाजपाला दिला. 

दरम्यान, आमच्या लाऊडस्पीकरसोबत तुमच्या पिपाण्या टिकणार नाही. ज्यापद्धतीने उद्धव ठाकरे सरकार घालवण्याचा प्रयत्न झाला. पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे तुम्ही आम्हाला सत्य, न्यायाच्या गोष्टी सांगू नका. ठाकरेंशिवाय शिवसेना नाही. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे हीच शिवसेना आहे. आमचा आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न करा पण आमचा आवाज तसाच राहील असंही राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस