Maharashtra Political Crisis: शिंदे गटाचे टेन्शन वाढणार! खातेवाटपानंतर आता दादा भुसे नाराज? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 10:00 AM2022-08-15T10:00:29+5:302022-08-15T10:01:42+5:30

Maharashtra Political Crisis: नाराज आमदार आणि मंत्र्यांची समजूत काढण्यासाठी एकनाथ शिंदेंना तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

shiv sena rebel mla and minister in shinde bjp govt dada bhuse unwilling after cabinet allocation | Maharashtra Political Crisis: शिंदे गटाचे टेन्शन वाढणार! खातेवाटपानंतर आता दादा भुसे नाराज? चर्चांना उधाण

Maharashtra Political Crisis: शिंदे गटाचे टेन्शन वाढणार! खातेवाटपानंतर आता दादा भुसे नाराज? चर्चांना उधाण

googlenewsNext

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर तब्बल ३८ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार केला. यानंतर काही दिवसांनी खातेवाटप जाहीर झाले. शिंदे-फडणवीस सरकारच्या खातेवाटपात अनेक धक्कादायक बदल दिसल्याचे बोलले जात आहे. खातेवाटपानंतर शिंदे गटातील नाराजी वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. या अनपेक्षित बदलामुळे शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि मंत्री दादा भुसे नाराज असल्याची चर्चा आहे. 

शिवसेनेत बंडखोरी करून शिंदे गटात गेलेल्या काही मंत्र्यांची मात्र निराशा झाल्याचे दिसत आहे. दादा भुसे हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये कृषीमंत्री होते. मात्र शिंदे सरकारमध्ये भुसे यांच्यावर बंदरे व खनिकर्म खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. भुसे यांच्याकडे आधीच्या तुलनेत दुय्यम खाते दिल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर दादा भुसे हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. आगामी काळात नाराज आमदार आणि मंत्र्यांची समजूत काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांना तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.

खातेवाटपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच वरचष्‍मा

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार या दिग्गज भाजप नेत्यांना धक्का देण्यात आला आहे. काहींना अनपेक्षितपणे महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. चार-पाच दिवसांपूर्वी माध्यमांमधून खातेवाटप जाहीर झाले तेव्हा तुमची यादी खोटी ठरेल, असे सूचक उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले होते. या खातेवाटपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच वरचष्‍मा दिसून आला आहे. फडणवीस यांच्याकडे सर्वात महत्त्‍वाची म्‍हणजे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती देण्यात आली आहेत. 

दरम्यान, मंत्रिमंडळाचा आणखी एक विस्तार बाकी असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्‍वतःकडे १३ खाती ठेवली आहेत. तसंच त्यांच्याकडे इतर कोणत्‍याही मंत्र्याला न वाटप केलेल्‍या खात्‍याचाही कारभार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आला आहे. शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ ही खाती असणार आहेत.
 

Web Title: shiv sena rebel mla and minister in shinde bjp govt dada bhuse unwilling after cabinet allocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.