शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही जरा समजून घ्या! संजय राऊतांनी सांगितला मुख्यमंत्री ठाकरेंच्या 'त्या' विधानाचा नेमका अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 20:37 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रावसाहेब दानवेंना उद्देशून केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा उल्लेख भावी सहकारी असा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं. खुद्द दानवे यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीदेखील मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं. शिवसेना आणि भाजप एकत्र येणार का, अशा चर्चा सुरू असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा नेमका अर्थ सांगितला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर शिवसेना-भाजप युतीची चर्चा रंगली असताना संजय राऊतांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. 'मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय, ते आपण नीट समजून घेण्याची गरज आहे. ते भावी सहकारी असं म्हणाले. याचा अर्थ भाजपमधील काही नेते महाविकास आघाडीत येऊ शकतात. भाजपमधले नेते आमच्याकडे येतील. आम्ही कुठेही जात नाही,' असं म्हणत राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला. अजित पवार लवकरच मोठा धमाका करणार? भाजपला जोरदार धक्का देण्याची तयारी

काय म्हणाले उद्धव ठाकरे?औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे एकाच व्यासपीठावर होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी केलेल्या एका विधानानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. 'व्यासपीठावर उपस्थित आजी, माजी आणि भविष्यात एकत्र आलो तर माझे भावी सहकारी...', असं विधान केलं आणि यावेळी मुख्यमंत्र्यांचा रोख भाजपाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या दिशेनं होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाची कार्यक्रमात जोरदार चर्चा सुरू झाली. 

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आजी सहकारी म्हणजेच काँग्रेसचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात, माजी सहकारी म्हणून उपस्थित भाजपाचे नेते असा उल्लेख केल्यानंतर भविष्यात एकत्र आलो तर भावी सहकारी असं म्हणत त्यांनी भाजपा नेत्यांकडे पाहिलं. उद्धव ठाकरेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलं आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात