शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-राष्ट्रवादीत संशयकल्लोळ; गृहखात्याची कारवाई; मुख्यमंत्री मात्र अनभिज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 11:35 IST

महाआघाडीत तीन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची समन्वय समिती बनविण्यात आली आहे. समितीने एकत्रित बसून एखादा निर्णय घेतला तर तो निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षांत कधीही डावललेला नाही, असे सांगून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले की, जर या प्रकरणातही अशा पद्धतीने तातडीने चर्चा झाली असती, तर आज सरकारला खुलासे करण्याची वेळ आली नसती.

अतुल कुलकर्णी -मुंबई : भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यासाठी रोखण्याच्या कारवाईवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये राजकीय तणातणी सुरू झाली. या सर्व प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे तीन पक्षांचे सरकार असल्याने समन्वयाने आणि चर्चेने प्रश्न सोडविले पाहिजेत. परस्पर निर्णय होत असतील आणि त्याचा परिणाम सरकारच्या स्थिरतेवर होत असेल तर हे अत्यंत धोकादायक आहे, अशी तीव्र भावनाही त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर, ‘वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना ब्रीफिंग केले की नाही माहिती नाही,’ असे म्हणत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी गृहविभागावर घेतली.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विधानानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचा विषय जेव्हा आला, तेव्हा सर्वांनी एकत्रितपणे चर्चा केली होती. शिवसेनेच्या एका नेत्याने स्पष्ट केले की, ज्या गोष्टींचा परिणाम सरकारच्या स्थिरतेवर होऊ शकतो असे विषय मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांच्याशी बोलूनच सोडविले गेले पाहिजेत. सोमय्या प्रकरणात तसे झाले नाही. परिणामी, विरोधकांना निष्कारण सरकारला बोल लावण्याची संधी मिळाली. मात्र राणे यांच्यावरील कारवाईची कसलीही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना नव्हती, असे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. महाआघाडीत तीन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची समन्वय समिती बनविण्यात आली आहे. समितीने एकत्रित बसून एखादा निर्णय घेतला तर तो निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षांत कधीही डावललेला नाही, असे सांगून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले की, जर या प्रकरणातही अशा पद्धतीने तातडीने चर्चा झाली असती, तर आज सरकारला खुलासे करण्याची वेळ आली नसती. गणपती विसर्जन असल्यामुळे राज्यमंत्री सतेज पाटील हे कोल्हापुरातच होते. पण, त्यांना याची कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. 

खुलासे करण्याची वेळजिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांनी निर्णय घेतले. ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले. आपले अधिकारी चुकले तरी शेवटी विभाग प्रमुख म्हणून ती जबाबदारी आपली आहे, असे म्हणत दिलीप वळसे-पाटील यांना अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीचे खुलासे करीत बसण्याची वेळ आली आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस