शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास भाजपा; 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी'वरुन शिवसेनेचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 19:07 IST

शिवरायांच्या वारसांना महाराजांची मोदींशी केलेली तुलना मान्य आहे का; संजय राऊत यांचा सवाल

मुंबई: भाजपानं प्रकाशित केलेलं 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तक वादात सापडलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही, अशा शब्दांत काँग्रेस, राष्ट्रवादीनं भाजपाला लक्ष्य केलं आहे. यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला खोचक टोला लगावला आहे. शिवरायांच्या वारसांना महाराजांची मोदींशी केलेली तुलना मान्य आहे का, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.  'आज के शिवाजी नरेंद्र मोदी असे महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महाशय कोण आहेत? हेच ते जयभगवान गोयल. यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला व मराठी  माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा', असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. 'जय भगवान गोयल आधी शिवसेनेत होते. महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली,' असंदेखील राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.  छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांच्या तुलनेवरुन संजय राऊत यांनी महाराष्ट्र भाजपावर शरसंधान साधलं आहे. 'महाराष्ट्र भाजपानं यावर भूमिका स्पष्ट करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना या विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही. एक सूर्य, एक चंद्र आणि एकच शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज,' अशा शब्दांत राऊत यांनी भाजपला लक्ष्य केलं. 'शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करून जयभगवान गोल महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली हे भाजपात शिरलेल्या छत्रपतीचया वंशजांना मान्य आहे का? सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयन राजे, श्रीमंत शिवेंद्रराजे, कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का?,' असे सवाल राऊत यांनी उपस्थित केले आहेत. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदी