शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टातून बऱ्याच गोष्टी...; भाजपचे संजय नको ते बोलून बसले; राऊतांच्या हाती आयते कोलीत दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 12:14 IST

शिवसेना खासदार संजय राऊतांना भाजप आमदार संजय कुटेंचा फुलटॉस

बुलढाणा: आमच्याविरोधात शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा कितीही वापरल्या, तरीही कोर्ट आमच्यासाठी आहे. कोर्टातून आम्हाला काय करायचं ते आम्ही भविष्यात करणार आहोत, असं विधान जळगाव जामोद-शेगावचे आमदार संजय कुटेंनी केलं आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका ठराविक पक्षाच्या नेत्यांनाच कोर्टाकडून दिलासा मिळाल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर आता कुटेंनी कोर्टाबद्दल प्रचंड विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

नेमकं काय म्हणाले संजय कुटे?मागच्या काही दिवसांत शेगाव शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत गुन्हेगारीच्या घटना घडल्या आहेत. यावरून भाजप आमदार संजय कुटेंनी पोलिसांना धारेवर धरलं. पोलिसच कायद्याचा दुरुपयोग करून शांतता बिघडवत असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलीस यंत्रणा आमच्याविरोधात कितीही वापरली, तरीही कोर्ट आमच्यासाठी आहे. कोर्टात न्याय मिळतो. कोर्टातून आम्हाला काय करायचं ते आम्ही भविष्यात करू. कोर्टातून बऱ्याच गोष्टी आम्हाला करता येतात, असं कुटे म्हणाले.

संजय राऊतांचं जोरदार प्रत्युत्तरन्यायालयांकडून विशिष्ट पक्ष आणि विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनाच गेल्या काही दिवसांपासून दिलासा मिळत आहे. हा दिलासा घोटाळा असल्याचं मी आधीच म्हटलं आहे. आता फडणवीसांचे उजवे हात मानले जाणारे आमदार संजय कुटे यांचं विधान त्याचीच पुष्टी करणारं आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. पोलीस प्रशासनाकडून ज्या गोष्टी करून घेता येत नाहीत, त्या गोष्टी न्यायालयाच्या माध्यमातून केल्या जात आहेत. दिशा सालियनपासून मुंबै बँक, विक्रांत निधी घोटाळ्यापर्यंत हेच दिसून आलं आहे. त्यामुळे न्यायालयात दिलासा देण्यासाठी काही माणसं बसवण्यात आली आहेत का, न्यायव्यवस्थेवर कोणाचा दबाव आहे का, असे प्रश्न राऊतांनी उपस्थित केले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा