शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: एटीएममधून मतदारांना मतदानासाठी पैसे वाटण्यात आले, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
3
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
4
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
5
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
6
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
7
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
8
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
9
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
10
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
11
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
12
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
13
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
14
Reliance Power Share Price : ₹४५० वर आलेला IPO, आता ₹२६ वर आला हा पॉवर शेअर; एक्सपर्ट म्हणाले...
15
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
16
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
17
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
18
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
19
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
20
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड

संजय राऊतांनी सांगितला 'फ्री काश्मीर'चा अर्थ; भाजपाला चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 10:23 AM

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन अमित शहांचा समाचार

मुंबई: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराच्या निषेधार्थ देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलनं सुरू केली आहेत. त्यापैकी गेटवे ऑफि इंडियाजवळील आंदोलन एका पोस्टरमुळे चर्चेत आलं आहे. गेटवे ऑफ इंडियाजवळ आंदोलन करणाऱ्या एका तरुणीनं हातात 'फ्री काश्मीर'चं पोस्टर धरलं होतं. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. फडणवीस यांनी ट्विटमधून उपस्थित केलेल्या प्रश्नाला राऊत यांनी उत्तर दिलं आहे. 'फ्री काश्मीरचा अर्थ संबंधित व्यक्तीनं सांगितल्याचं मी वर्तमानपत्रात वाचलं. फ्री काश्मीरचा अर्थ काश्मीरची निर्बंधांमधून मुक्तता करा असा होतो. काश्मीरमधील इंटरनेट, मोबाईल सेवा बंद आहे. तिथे आणखीही काही प्रकारचे निर्बंध लागू आहेत. त्या निर्बंधांतून काश्मीरला मुक्त करा, अशी मागणी आंदोलक तरुणी करत असल्याचं माझ्या वाचनात आलं आहे,' असं राऊत पुढे म्हणाले. काश्मीरला भारतापासून मुक्त करा, असं कोणी म्हणत असेल तर ते सहन करणार नाही, असा आक्रमक पवित्रादेखील राऊत यांनी घेतला. जेएनयूमध्ये भ्याड हल्ला करणाऱ्यांचा संजय राऊत यांनी निषेध केला. 'रात्रीच्या अंधारात तोंड लपवून अतिरेकी, चोर, दरोडेखोर येतात. त्यांच्यात इतकी हिंमत होती तर तोंड झाकून हल्ला का केला?,' असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा खरपूस समाचार घेतला. सुधारित नागरिकत्व कायद्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी शहा सध्या घरोघरी जाऊन पत्रकं वाटत आहेत. देशाच्या गृहमंत्र्यांना हे शोभत नाही. घराघरात जाऊन पत्रकं वाटणं हे गृहमंत्र्यांचं काम नव्हे, असा टोला त्यांनी लगावला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतJammu Kashmirजम्मू-काश्मीर