शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

...तर २०२४ मध्ये देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही; संजय राऊतांचं विरोधकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 10:23 IST

हिमाचलमध्ये काँग्रेस ज्या पद्धतीने लढतीय त्याबाबत त्यांचे अभिनंदन करावे लागेल असं राऊतांनी सांगितले.

मुंबई - गुजरात आणि हिमाचल प्रदेशाच्या निकालाचे पडसाद आता सगळीकडे उमटू लागले आहेत. गुजरातमध्ये मागील २७ वर्षांची सत्ता राखतानाच भाजपाने याठिकाणी रेकॉर्डब्रेक कामगिरीच्या दिशेने वाटचाल केलीय. गुजरातचा निकाल अपेक्षित होता. याठिकाणी विरोधकांनी एकत्र येत निवडणूक लढवायला हवी होती तर भाजपाला काटे की टक्कर देता आलं असतं असं विधान शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. 

संजय राऊत म्हणाले की, मतविभागणी झाली नसती तर विरोधकांना यश मिळालं असते. देशाच्या राजधानीत आपला मिळालेले यश कौतुकास्पद आहे. १५ वर्षाची सत्ता हिसकावून घेणे हे सोप्पं काम नाही. पण कदाचित दिल्ली तुम्हाला सोडतो आणि गुजरात आम्हाला सांभाळू द्या अशी तडजोड झालीय का अशी शंका आहे असं सांगत अप्रत्यक्षपणे राऊतांनी आप-भाजपात डिल झाल्याचा आरोप केला. 

तर हिमाचलमध्ये काँग्रेस ज्या पद्धतीने लढतीय त्याबाबत त्यांचे अभिनंदन करावे लागेल. देशाच्या पुढील निवडणुकीत आशादायक चित्र आहे. पण विरोधकांनी मतविभागणी टाळणं गरजेचे आहे. तर २०२४ मध्ये देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. विरोधकांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे असं आवाहनही खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

राहुल गांधींचा संबंध नाही गुजरात निकालाचा संदर्भ राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेशी लावणं चुकीचे आहे. राहुल गांधी काँग्रेस अंतर्गत राजकारणापासून लांब आहे. देश जोडणे, लोकांची मने जोडणे, संघर्ष थांबवणे यासाठी राहुल गांधींनी यात्रा सुरू आहे. त्यामुळे या निवडणूक निकालाशी राहुल गांधींना जोडणे योग्य नाही असं सांगत गुजरात निकालावरून राहुल गांधींना टार्गेट करणे योग्य नाही असं राऊतांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपाSanjay Rautसंजय राऊत