शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 17:28 IST2020-08-29T17:27:29+5:302020-08-29T17:28:05+5:30
नागरिकांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली असावी अशी शक्यता त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली.

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांना कोरोनाची लागण
मुंबई: मागाठाणे विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी कोरोनाची चाचणी केली ती पॉझिटिव्ह आली.सध्या त्यांच्यावर मुंबई सेंट्रल येथील व्होकार्ड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मतदार संघात धान्य वाटप,मास्क व सॅनिटायझर वाटप, डॉक्टरांना पीपीई किट वाटप आदींचे त्यांनी लॉकडाऊनच्या सुरवातीपासून वाटप केले. नागरिकांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली असावी अशी शक्यता त्यांच्या निकटवर्तीयांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली.