शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

अन्यथा एमआयएमला घरात घुसून मारू : शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 12:12 PM

आमच्यातीलच एकाने दिलेल्या दगाबाजीमुळे शिवसनेचे नेते चंद्रकात खैरे यांचा निसटता अपघाताने पराभव झाला.

औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेत एमआयएमच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला होता. त्यानंतर आज शिवसनेचा मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून एमआयएमचा समाचार घेण्यात आला आहे.  औरंगाबादचा हिंदू नामर्द बनलेला नाही. हिंदूंच्या अंगावर येणाऱ्यांना 'औरंगाबादे'त घरात घुसून मारू, असा इशारा देत शिवसनेने  एमआयएमवर निशाणा साधला.

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेत एमआयएमच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ घातल्याने, पोलिसांनी त्यांना उचलून बाहेर काढले होते. याच प्रकरणावरून शिवसनेने सामनामधून एमआयएमवर जोरदार हल्ला चढवला आहे. आमच्यातीलच एकाने दिलेल्या दगाबाजीमुळे शिवसनेचे नेते चंद्रकात खैरे यांचा निसटता अपघाताने पराभव झाला. मात्र, या पराभवामुळे हिंदू नामर्द बनला असे समजू नका. हिंदुच्या रक्षणासाठी 'औरंगाबादे'त घरात घुसून मारू. औरंगाबादच्या अस्मितेसाठी व हिंदूरक्षणासाठी शिवसेनचा लढा चालूच राहील , असा इशारा  सामनामधून देण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीत खैरेंचा पराभव झाल्यापासून शिवसेना आणि एमआयएमधील वाद मोठ्याप्रमाणात वाढला आहे. औरंगाबाद महानगरपालिकीच्या शासकीय कार्यक्रमात जलील यांना डावलून माजी खासदार खैरे यांना बोलवल्यावरून काही दिवसांपूर्वी दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे येणाऱ्या काळात औरंगाबादचे विकासाचे प्रश्न वगळून दोन्ही पक्षाच्या वादावादीतच पाच वर्षे जाणार तर नाही ना? असा प्रश्न औरंगाबादकरांना पडत आहे.

हर्षवर्धन जाधवांचा समाचार

सामनाच्या अग्रलेखातून एमआयएमसोबतच कन्नडचे आमदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावाई हर्षवर्धन जाधव यांचा सुद्धा समाचार घेण्यात आला आहे. औरंगाबादमधील शिवसनेचा भगवा उतरवणारे हात आपल्यातल्याच सूर्याजी पिसाळांचे होते, असे म्हणत जाधव यांच्यावर निशाणा  साधण्यात आला. आपल्यातीलच दगा देणाऱ्या खानाने हातात हिरवे फडके बाधून नमाज अदा करावी असा टोला जाधव यांना शिवसनेने लगावला आहे.