Shiv Sena makes new plan for expansion in state | आता मुंबईतील शिवसैनिक गावपातळीवर पक्ष वाढविणार

आता मुंबईतील शिवसैनिक गावपातळीवर पक्ष वाढविणार

- दीपक शिंदे 

सातारा : मुंबई आणि ठाणे फार तर कोकणच्या पलीकडे विस्ताराची अपेक्षा नसलेल्या शिवसेनेने आता राज्यभर विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत राहणाऱ्या मात्र गावाशी नाळ जोडलेल्या मुंबईकरांचा त्यासाठी उपयोग करून घेण्यात येणार आहे. गावात दोन संपर्क प्रमुख नेमण्यात येणार असून, त्यांच्यामार्फत गावातील अडचणी समजून घेतल्या जातील. तर त्यांच्याशी समन्वय साधण्याचे काम मुंबईतील गावकरी करणार आहेत. प्रत्येक गावातील दोन कामे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुचविण्यासही सांगण्यात आले आहे. सेनेने प्रत्येक गावात संपर्क प्रमुख नेमून गावाचा विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Web Title: Shiv Sena makes new plan for expansion in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.