आता मुंबईतील शिवसैनिक गावपातळीवर पक्ष वाढविणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 07:01 IST2020-02-27T03:14:37+5:302020-02-27T07:01:27+5:30
शिवसेनेने आता राज्यभर विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे.

आता मुंबईतील शिवसैनिक गावपातळीवर पक्ष वाढविणार
- दीपक शिंदे
सातारा : मुंबई आणि ठाणे फार तर कोकणच्या पलीकडे विस्ताराची अपेक्षा नसलेल्या शिवसेनेने आता राज्यभर विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत राहणाऱ्या मात्र गावाशी नाळ जोडलेल्या मुंबईकरांचा त्यासाठी उपयोग करून घेण्यात येणार आहे. गावात दोन संपर्क प्रमुख नेमण्यात येणार असून, त्यांच्यामार्फत गावातील अडचणी समजून घेतल्या जातील. तर त्यांच्याशी समन्वय साधण्याचे काम मुंबईतील गावकरी करणार आहेत. प्रत्येक गावातील दोन कामे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुचविण्यासही सांगण्यात आले आहे. सेनेने प्रत्येक गावात संपर्क प्रमुख नेमून गावाचा विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.