शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

चार महत्त्वाच्या मंत्रिपदांचा प्रश्न सुटला; पण काँग्रेसच्या हाती भोपळा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 19:51 IST

शिवसेना, राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन महत्त्वाची खाती

मुंबई: भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळात नेमकं कोणाला कोणतं खातं मिळणार, याबद्दल मोठी उत्सुकता आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन जवळपास दोन आठवडे झाले आहेत. त्यामुळे मंत्रिपदांचं वाटप नेमकं केव्हा होणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विकास आघाडीनं चार महत्त्वाच्या मंत्रिपदांचा प्रश्न मार्गी लागल्याचं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीनंदिलं आहे. मुख्यमंत्रिपद मिळवण्यात यश मिळवल्यानंतर शिवसेना आणखी दोन महत्त्वाची मंत्रिपदं पदरात पाडून घेण्यात यशस्वी ठरली. गृह आणि नगरविकास खातं शिवसेना स्वत:कडे ठेवणार आहे. तर गृहनिर्माण आणि अर्थ मंत्रालय राष्ट्रवादीकडे जाणार असल्याचं समजतं. अद्याप काँग्रेसला कोणतंही मंत्रिपद निश्चित झालेलं नाही. त्यामुळे काँग्रेसला नेमकी कोणती मंत्रिपदं मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, नितिन राऊत यांनी मंत्रिपदांची शपथ घेतली. मात्र अद्याप या मंत्र्यांना पदभार देण्यात आलेला नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास खाती स्वत:कडे ठेवली होती. त्याचप्रमाणे शिवसेनेनंदेखील ही खाती स्वत:कडे घेतली आहेत. फडणवीस यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरेही दोन्ही महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासोबतच राष्ट्रवादी उपमुख्यमंत्रिपद कोणाला देणार, बंडखोरी करणाऱ्या अजित पवारांचं काय होणार, याकडेही राज्याचं लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी