शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 07:58 IST

Eknath Shinde News : महायुतीला स्पष्ट कौल मिळाल्यानंतर आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ५७ जागा मिळाल्याने मुख्यमंत्रि‍पदाचा आग्रह पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांकडून होऊ लागला आहे. 

Eknath Shinde Latest News: भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. मात्र, स्पष्ट जनादेश मिळालेला असताना मुख्यमंत्री कोण होणार, याबद्दलचा सस्पेन्स संपलेला नाही. यापूर्वी इतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने प्रत्येक वेळी नवा चेहरा देऊन धक्का दिला. त्यामुळे महाराष्ट्रात काय होणार, याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते, आमदार मुख्यमंत्रि‍पदासाठी आग्रह करू लागले आहेत. अशात एकनाथ शिंदे यांनी सर्वांना एक मेसेज दिला आहे. 

विधानसभा निवडणुकीत भाजप १३२ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपनंतर सर्वाधिक जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने जिंकल्या आहेत. ५७ जागा जिंकत दुसऱ्या स्थानी असलेल्या शिवसेनेतून आता एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याची मागणी होऊ लागली आहे. 

शिवसेनेचे काही आमदार, नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीलाही गेले होते. दरम्यान, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचे निरोप गेले असल्याचे समजते. याबद्दल एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज दिला आहे. 

एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे की, "महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत."

"माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही  एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील", असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.  

शिंदे-पवार दिल्लीला जाणार

महायुतीत मुख्यमंत्रि‍पदाचा आणि मंत्रि‍पदाच्या वाटपाचा तिढा निर्माण झाल्याचे चित्र तयार झाले आहे. सोमवारी मुख्यमंत्रिपदाचं नाव जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, पण तसा कोणताही निर्णय झाला नाही. देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची बैठक होऊ शकली नाही. 

दरम्यान, आज (२६ नोव्हेंबर) एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही नेते अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटीत नव्या मंत्रिमंडळाबद्दल चर्चा होणार असल्याची चर्चा आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा