शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
2
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
3
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
4
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
5
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
6
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
7
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
8
Health Tips: हृदय विकाराच्या 'या' सात सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच करा उपाय!
9
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
10
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
11
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
12
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
13
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
14
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
15
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
16
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
17
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
18
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
19
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
20
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
Daily Top 2Weekly Top 5

नव्या सरकारचा शपथविधी मध्यरात्री करणार की पहाटे?; राऊतांचा चंद्रकांत पाटलांना 'रोखठोक' सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 08:41 IST

Sanjay Raut : ठाकरी बाण्याने राज्यातील विरोधी पक्ष दिशाहीन झालाय, राऊत यांचा निशाणा.

महाराष्ट्रातील ‘ठाकरे’ सरकारला दोन वर्षे होत आहेत. त्याच वेळी श्री. देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेलाच घेतलेल्या शपथविधी सोहळ्यासही दोन वर्षे झाली. मागच्या दोन वर्षांत सरकार पाडू न शकलेला विरोधी पक्ष आजही सरकार पाडण्याची नवी तारीख देतोय हा विनोद म्हणावा लागेल, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

मुख्यमंत्री ठाकरे आज प्रकृतीच्या कारणाने इस्पितळात आहेत, पण ठाकरी बाण्याने राज्यातील विरोधी पक्ष दिशाहीन झाला. राजकारणात सदैव खोटेपणाचा जय होतोच असे नाही. विरोधी पक्षाने नक्की काय गमावले?, असेही राऊत म्हणाले. राऊत यांनी रोखठोक या सदरातून भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे.

पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षेमहाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच वेळी  देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ पहाटेच घेतली त्या सोहळ्यासही दोन वर्षे पूर्ण झाली. मुख्यमंत्री ठाकरे सध्या पाठीच्या दुखण्यामुळे इस्पितळात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती उत्तम आहे, पण दोन वर्षांत प्रकृती बिघडली आहे ती राज्यातील विरोधी पक्षाची, असे म्हणत त्यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला.

भ्रमातून बाहेर पडावेसरकारला दोन वर्षे झाली त्यानिमित्ताने चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘ठाकरे सरकार आता लवकरच पडेल!’’ म्हणजे तारखा देण्याच्या फंदातून व छंदातून भाजप अद्यापि बाहेर पडलेला नाही. ठाकरे सरकार पडणार व पुन्हा आम्ही शपथ घेणार, असे पाटील यांना वाटत असेल तर कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. फक्त त्यांनी इतकेच स्पष्ट केले पाहिजे की, नव्या सरकारचा शपथविधी ते मध्यरात्री करणार की पहाटे? हेच पाटील काही दिवसांपूर्वी पक्षाच्या कार्यकारिणीत म्हणाले होते, ‘‘सरकार पडेल व आम्ही सत्तेवर येऊ या भ्रमातून पक्षाने आता बाहेर पडले पाहिजे. आता विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडावी लागेल.’’ तेच पाटील चार दिवसांत ठाकरे सरकार पडेल असे छातीठोकपणे सांगतात, असेही राऊत रोकठकमधून म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे हे गेल्या दोन वर्षांत सगळय़ांना पुरून उरले आहेत. गेल्या दोन वर्षांत ठाकरे सरकारला बदनाम करण्यासाठी व कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी कोणतीच कसर सोडली नाही. ज्याला राजकारणात ‘बिलो द बेल्ट’ म्हटले जाते ते सर्व कमरेखालचे वार करूनही सरकार कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा