शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

ही सत्य आणि असत्याची लढाई, गद्दारी खपवून घेतली जाणार नाही - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 17:00 IST

शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली.

राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त करत गद्दारी खपवून घेतली जाणार नसल्याचं म्हटलं.

“कार्यकारिणीची बैठक संपली आहे. सर्व मुद्दे सर्वांना माहितच आहेत. महत्त्वाचं म्हणजे गद्दारी खपवून घेतली जाणार नाही. शिवसेना ही विजयी होणार म्हणजे होणारच. जे पळून गेलेत त्यांच्याविरोधात ही एक सत्य आणि असत्याची लढाई आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

सहा ठराव मंजूर

शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी आजवर पक्षाच्या प्रगतीसाठी केलेले काम आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोरोना काळात केलेलं उल्लेखनीय काम याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत मंजुर करण्यात आला. या ठरावावर सर्वांना टाळ्या वाजवून आणि उद्धव ठाकरे यांचं कौतुक करत सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले.

शिवसेना ही बाळासाहेबांची होती, आहे आणि राहील. इतर कुणीही स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरू शकत नाही. तसं केल्यास रितसर तक्रार आणि कारवाई करण्यासाठीची पावलं उचलली जातील असा दुसरा ठराव संमत करण्यात आला.

शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सर्वाधिकार हे राष्ट्रीय कार्यकारिणी पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना देण्यात आला. हा ठराव खासदार संजय राऊत यांनी मांडला

बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. या ठरावामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडून आता बंडखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे.

शिवसेनेने आपल्या ठरावात पुन्हा एकदा मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नसल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली प्रत्येक महानगरपालिकेवर भगवा आगामी महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली प्रत्येक महानगरपालिकेवर भगवा फडविण्याच्या निर्धाराचा ठराव यावेळी संमत करण्यात आला.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र