शिवसेना नेते दिनेश वानखडे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 09:23 PM2021-03-07T21:23:45+5:302021-03-07T21:24:42+5:30

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख दिनेशनाना वैकुंठराव वानखडे (५६, रा. तिवसा) यांचे ७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता दरम्यान निधन झाले.

Shiv Sena leader Dinesh Wankhade passes away | शिवसेना नेते दिनेश वानखडे यांचे निधन

शिवसेना नेते दिनेश वानखडे यांचे निधन

googlenewsNext

तिवसा (अमरावती) :

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख दिनेशनाना वैकुंठराव वानखडे (५६, रा. तिवसा) यांचे ७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता दरम्यान निधन झाले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. म्हाडाच्या अध्यक्षपदासह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालकपदसुद्धा त्यांनी भूषविले. पाच-सहा दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने अमरावती येथे खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचाराला साथ न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी तिवसा येथे हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Web Title: Shiv Sena leader Dinesh Wankhade passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.