“झाल्या असतील चुका, सर्व माफ करून एकत्र यावं,” दीपाली सय्यद यांच्याकडून रक्षाबंधनाच्या अनोख्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 15:13 IST2022-08-11T15:13:25+5:302022-08-11T15:13:58+5:30

उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांचा फोटो शेअर करत दीपाली सय्यद यांनी दिल्या अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा.

shiv sena leader deepali sayed rakshabandhan wishesh shares eknath shinde uddhav thackeray photo said come together again | “झाल्या असतील चुका, सर्व माफ करून एकत्र यावं,” दीपाली सय्यद यांच्याकडून रक्षाबंधनाच्या अनोख्या शुभेच्छा

“झाल्या असतील चुका, सर्व माफ करून एकत्र यावं,” दीपाली सय्यद यांच्याकडून रक्षाबंधनाच्या अनोख्या शुभेच्छा

आज रक्षाबंधनाचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. अनेक नेतेमंडळींनीही रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्यात. दरम्यान, शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनीदेखील अनोख्या पद्धतीनं रक्षाबंधानाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो शेअर केलाय. तसंच त्यांनी पुन्हा एकत्र यावं अशी अपेक्षाही व्यक्त केलीये.

“शिवसैनिकांच्या हातात आजही शिवबंधन आहे. धागा कितीही साधा असला तरी आपले शिवसेना परिवाराचे नाते अतुट आहे. कित्येक पटीनं चुका झाल्या असतील तरी सर्व माफ करून एकत्र यावं, याच रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा,” असं दीपाली सय्यद म्हणाल्या. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक फोटो शेअर करत या शुभेच्छा दिल्या.


यापूर्वीही उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांमध्ये त्यांनी सर्वांना पुन्हा एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. “शिवसेना आमचे कुटुंब, त्याचे कुटुंबप्रमुख तुम्ही. भगवा डौलाने फडकवावा, त्या धनुष्याचे पाईक आम्ही. या शुभप्रसंगी रुसलेल्या चुकलेल्या शिवसैनिकांना माफ करा तुम्ही. आरोग्यमय आयुष्य लाभो तुम्हाला शिवसेना एकत्र करा तुम्ही,” असं ट्वीट त्यांनी केलं होतं.

Web Title: shiv sena leader deepali sayed rakshabandhan wishesh shares eknath shinde uddhav thackeray photo said come together again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.