शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 08:14 IST

Eknath Shinde On Uddhav Thackeray: या निवडणुकीतही मतदार तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा उपमुख्यमंत्री व शिंदेसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काही लोकांना निवडणुका आल्यावर जनतेची आठवण येते, एरवी हम दो हमारे दो असते. निवडणुकीचे वारे फिरायला लागल्यावर यांना हिंदुत्व, मराठी माणूस आठवतो आहे. पण मतदार या निवडणुकीतही तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा उपमुख्यमंत्री व शिंदेसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. वरळी येथे आयोजित शिंदेसेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर शिंदेसेनेचे मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते. ऑपरेशन सिंदुरनंतर भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात समावेश असलेल्या खा. श्रीकांत शिंदे आणि मुरली देवरा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तर या अनुभवावर आधारित त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रमही झाला.

उद्धव ठाकरेंचा समाचार घेताना शिंदे पुढे म्हणाले की, हे आता मराठी माणसाच्या नावाने खोटे गळे काढतील. मला विचारायचे आहे बाळासाहेबांनंतर मराठी माणसासाठी यांनी काय केले त्याचा हिशोब द्या. तुमच्या नाकर्तेपणामुळे मुंबईतील मराठी माणूस बाहेर गेला, हे पाप तुमचे आहे, गेली २० वर्ष मुंबईत कुणी सत्ता गाजवली हे सर्वश्रुत आहे.

नवे अभियानसासरच्या छळाला कंटाळून एका लेकीने आपले आयुष्य संपवले. ही वृत्ती ठेचून काढली पाहिजे, त्यासाठी आज आपण ‘लाडक्या लेकीचे रक्षण, हेच शिवसेनेचे वचन’ अभियान सुरू केले आहे. प्रत्येक घरातील सून ही एकनाथ शिंदेची लाडकी बहीण आहे हे सांगून ठेवतो, अशा इशारा शिंदेंनी दिला आहे.

हा देशद्रोहापेक्षा मोठा गुन्हा उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले कम ऑन किल मी, ते इंग्लीश पिक्चर बघून आले असतील, पण मरे हुए को क्या मारना, महाराष्ट्राने विधानसभा निवडणुकीत तुमचा मुडदा पाडला. नुसता करून शोर मनगटात येत नाही जोर, वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही, त्याला शेर का कलेजा लागतो, अशा शब्दात शिंदेंनी ठाकरेंच्या भाषणाचा समाचार घेतला. ऑपरेशन सिंदुरवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींचाही शिंदे यांनी यावेळी समाचार घेतला. गांधींचा आपल्या लष्करावर, पंतप्रधानांवर विश्वास नाही, त्यांना पाकिस्तानवर विश्वास आहे. गांधी आणि उबाठाच्या चमच्यांना प्रश्न पडलाय किती विमाने पडली, किती ड्रोनचे नुकसान झाले. भारतीय लष्कराच्या पराक्रमावर प्रश्न विचारताय, हा देशद्रोहापेक्षा मोठा गुन्हा आहे. तुम्ही भारतीय आहात की पाकचे एजंट आहात, असा सवाल शिंदेंनी केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणMumbaiमुंबईShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र