शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता व्हाया मध्यप्रदेश; शरद पवार नाही 'या' नेत्याची मोठी मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 15:24 IST

शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी चर्चा सुरू होती. आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने बोलणी सुरू केली होती.

भोपाळ : पक्षांच्या विचारधारा परस्परविरोधी असतानाही महाराष्ट्रात काँग्रेसच्या पाठिंब्याने शिवसेनेचे सरकार स्थापन होणार आहे. या दोन पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केल्याचे सर्वश्रूत आहे. पण यामध्ये आणखी एक नाव आले आहे. सत्तास्थापनेचे अडकलेले घोडे मध्यप्रदेशच्या मदतीने गंगेत न्हाल्याचे समजते. 

शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी चर्चा सुरू होती. आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने बोलणी सुरू केली होती. काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते चर्चा करत होते. त्यातच दिल्लीला विचारून पुन्हा चर्चा होत होती. काँग्रेसचे सारे निर्णय दिल्लीतून होत असल्याने नेत्यांना अवलंबून रहावे लागत होते. यातच शिवसेना आणि काँग्रेसची विचारधारा वेगवेगळी, त्याचा देशाच्या राजकारणावर होणारा परिणाम आदी गोष्टी अडलेल्या होत्या. 

यामुळे काँग्रेस हातमिळवणीसाठी फारशी उत्सुक नव्हती. स्वत: शरद पवार देखील सोनिया गांधींना भेटले होते. तेव्हाही चित्र स्पष्ट होत नव्हते. काँग्रेस पक्षाच्या बैठकीत शिवसेनेसोबत जाण्याची शक्यता जवळपास संपली होती. महाराष्ट्रतील सारे नेते या बैठकीला होते. तर आमदारांना जयपूरला ठेवण्यात आले होते. अशातच 11 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यास सांगितले. तेव्हाच एका शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना फोन केला. दिल्ली बिहार आणि झारखंडच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस विचारधारेला धक्का पोहोचवण्यास इच्छुक नव्हती. 

यामुळे काँग्रेसने पाठिंब्याचे पत्र दिले नव्हते. यानंतर कमलनाथ यांनी 18 ते 21 नोव्हेंबर या काळात सोनिया गांधी, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा केली. यानंतर खरेतर काँग्रेसने शिवसेनेला सत्तेच्या चाव्या देण्याचे मान्य केले. शिवसेनेला पाठिंबा दिल्यास काँग्रेसवरचा अल्पसंख्यांकांसाठीचा पक्ष असल्याचा डाग पुसता येईल, असे जेव्हा सोनिया गांधींना पटले तेव्हा होकार मिळाल्याचे कमलनाथांच्या एका जवळच्या नेत्याने सांगितले. 

काँग्रेसच्या होकाराची बातमी लीक झाली आणि राज्यात भूकंप झालामध्य प्रदेशच्या काँग्रेस नेत्याने सांगितले की, 22 नोव्हेंबरला सायंकाळी भाजपाला महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याचे समजले. यामुळे भाजपामध्ये खळबळ उडाली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवारांच्या साथीने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. आज उद्धव ठाकरे यांनी कमलनाथ यांना शपथविधीला उपस्थित राहण्याचे खास निमंत्रण पाठविले आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारMadhya Pradeshमध्य प्रदेशMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना