शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला विकासाशी देणेघेणे नाही-राणे

By admin | Updated: April 7, 2015 04:26 IST

मराठी माणसाच्या जीवावर राजकारण करीत असलेल्या शिवसेनेला त्यांच्या विकासासाठी काहीही देणेघेणे नाही. इतकी वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता ताब्यात असूनही

मुंबई : मराठी माणसाच्या जीवावर राजकारण करीत असलेल्या शिवसेनेला त्यांच्या विकासासाठी काहीही देणेघेणे नाही. इतकी वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता ताब्यात असूनही त्यांनी मूलभूत सुविधांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या भडकावू राजकारणाला आता जनता भीक घालणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व वांदे्र (पू) पोटनिवडणूकीतील कॉँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी केले. यावेळी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सलमान खुर्शीद यांनी सेना व एमआयएम सारख्या जातीयवादी पक्षापासून मतदारांनी सावध रहावे असे आवाहन केले. सोमवारी राणे यांनी या परिसरात कॉर्नर सभा घेत सेना-भाजपा आणि एमआयएमच्या धोरणावर तीव्र टीका केली. ते म्हणाले,‘ जातीय राजकारणाला जनता आता कंटाळलेली आहे. मग त्याचा प्रचार आणि प्रसार तो शिवसेना-भाजपाकडून होवो की एमआयएमकडून. त्यांना आता केवळ विकासाची गरज आहे. वांदे्रतील मतदार अनेक वर्षापासून नागरी विकासापासून वंचित आहे. याठिकाणच्या सेनेचे आमदार व नगरसेवकांनी केवळ मतांसाठी त्यांचा वापर करुन घेतला आहे. अल्पसंख्याक समाज कॉँग्रेसच्या पाठिशी असून एमआयएमच्या उमेदवाराचा फायदा जातीयवादी शक्तीला होतो, हे त्यांना समजून चुकले आहे. त्यामुळे पुन्हा ते चूक करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)