शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

धाडीमागून धाडी सुरू आहेत, प्रत्येकाचा दिवस असतो; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 09:16 IST

भाजपशी आमची युती झाली तेव्हा बाळासाहेबांनी, ‘तुम्ही देश सांभाळा आम्ही राज्य सांभाळतो’ असे सांगितले होते. पण आजकाल सगळेच त्यांना हवे आहे मग आम्ही काय फक्त धुणीभांडी करायची का? : उद्धव ठाकरे

 मुंबई : ‘धाडीमागून धाडी सुरू आहेत, प्रत्येकाचे दिवस येतात’, या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरू असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवर केंद्र आणि भाजपला एका कार्यक्रमात बोलताना सुनावले. मुख्यमंत्री म्हणाले की पश्चिम बंगाल अन् महाराष्ट्र ही दोनच राज्ये केंद्रीय यंत्रणांना दिसत आहेत. तुम्हाला भ्रष्टाचार दिसतो ना, जरूर काढा, पण त्यामागे विकृतीची लागण दिसते. ही साथ पसरायची नसेल तर लवकरात लवकर बदल करावा लागेल. 

जनतेचा आशीर्वाद नसताना सत्तेचा दुरुपयोग करून सत्ता मिळवणारच या केंद्र सरकारच्या वृत्तीमुळे राजकारण नासवून टाकले आहे आणि त्यातूनच केंद्र व राज्य संघर्ष सुरू झाला, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आम्ही काय धुणीभांडी करायची का?भाजपशी आमची युती झाली तेव्हा बाळासाहेबांनी, ‘तुम्ही देश सांभाळा आम्ही राज्य सांभाळतो’ असे सांगितले होते पण आजकाल सगळेच त्यांना हवे आहे मग आम्ही काय फक्त धुणीभांडी करायची का? त्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केलेली नव्हती असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला हाणला. भाजपसोबत युतीच्या शक्यतेबाबत ते म्हणाले की भाजप आधी सुधारणार आहे का? त्यांची वैचारिक पातळी पाताळात गेली आहे. कुणाहीबरोबर जाण्याचा त्यांचाच कित्ता आम्ही गिरविला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा