शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

१७५ आमदारांच्या पाठिंब्याचा शिवसेनेचा दावा; महायुतीतील तणाव कायमच!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 5:52 AM

सत्तेचा तिढा सुटेना : गुंडांकडून आमदारांवर दबाव, संजय राऊत यांचा आरोप

मुंबई : शिवसेनेकडे १७५ आमदारांचे संख्याबळ असून सत्ता स्थापनेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल आणि शिवतिर्थावर शपथविधी होईल, असा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी केला. त्यामुळे महायुतीतील तणाव कायमच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

भाजपने शपथविधीसाठी वानखेडे स्टेडीयमवर तयारी चालविल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे राऊत म्हणाले. शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या १७५ पर्यंत पोहोचली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील इच्छा आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल आणि शिवाजी पार्कात शपथविधी पार पडेल, असे राऊत म्हणाले.शिवसेना कोणाच्या पाठिंब्यावर सरकार बनवणार असा प्रश्न विचारला असता, सत्तेचे गणित जमले की लवकरच आम्ही ते माध्यमांसमोर मांडू, असे सांगत याबाबत अधिक बोलणे त्यांनी टाळले. मात्र, सत्तेच्या वाटपाबाबत माध्यमात ज्या बातम्या येत आहेत त्या खोट्या आहेत.अमित शाह यांच्यासोबतचे संबंध मधुरच

देशाचे गृहमंत्री अमित शाह हे काळाची पावले ओळखणारे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्र्वी परिस्थिती ओळखूनच त्यांनी युती केली. राज्यातील सत्तेच्या वाटाघाटी त्यांच्यासमोर झाल्या आहेत. मात्र, सध्या शाह यांचे मौन रहस्यमय आहे. हरियाणासारख्या छोट्या राज्यातील तिढा सोडवण्यासाठी शाह यांनी पुढाकार घेतला. मात्र, महाराष्ट्राबाबतची त्यांची भूमिका रहस्यमय असल्याचे सांगतानाच शाह आणि शिवसेनेचे संबंध मधुर असल्याचेही राऊत म्हणाले. सरकार बनवण्यासाठी ज्या-ज्या सरकारने ईडीचा वापर केला आहे, त्यावर हा निर्णय बूमरँग झाला आहे. सध्या तुरूंगातून सुटलेले गुंड मोठ्या पदांवर बसले आहेत. त्यांचा वापर करून आमदारांवर दबाव आणला जात आहे. कोण, कुठे भेटत आहे, कसा दबाव आणत आहेत याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. या गुंडागर्दीचा लवकरच गौप्यस्फोट करू. भाजपचे राजकारण हे गुंडांच्या टोळ््यांपेक्षाही घाणेरडे बनले आहे, अशी टीकासुद्धा राऊत यांनी केली.‘शरद पवार राज्यात येणार नाहीत’शरद पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा आहेत. तसेच पवार भेटीबाबत राऊत म्हणाले की, पवार मोठे नेते आहेत. ते मुख्यमंत्रिपदापेक्षा मोठे आहेत. ते राज्याच्या राजकारणात येणार नाहीत. जेव्हा अशाप्रकारची राजकीय परिस्थिती उद्भवते त्यावेळी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही पवारांचे मार्गदर्शन घेतात. आम्ही घेतले तर काय चुकले?चर्चा होईल ती फक्त मुख्यमंत्रिपदावरचशिवसेना आणि भाजपमध्ये फक्त मुख्यमंत्रिपदावरच चर्चा होईल. आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. महाराष्ट्रात खोट्याचं राजकारण चालत नाही.- खा. संजय राऊतभूमिकांवर दोघेही ठामभाजपला पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद हवे आहे आणि शिवसेनेला ते अडीच -अडीच वर्षे विभागून हवे आहे. दोघेही आपल्या भूमिकेवर एकदम ठाम असल्याने सत्ता वाटपाचा तिढा सुटता सुटेना असे चित्र रविवारीदेखील कायम राहिले.‘मी पुन्हा येईन’ म्हटले की, भीती वाटते - उद्धव ठाकरेपरतीचा पाऊस ‘मी पुन्हा येईन’ असे म्हटले की, भीती वाटते, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत लगावला. विधानसभा रणधुमाळीत मुख्यमंत्र्यांनी ‘मी पुन्हा येईन’चा नारा दिला होता. ठाकरे यांनी परतीचा पाऊस आणि फडणवीस यांच्या त्या शब्दांवर एकप्रकारे राजकीय कोटी केली. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMLAआमदार