शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल , प्रकृती उत्तम

By Admin | Updated: May 11, 2016 14:13 IST2016-05-11T14:05:54+5:302016-05-11T14:13:39+5:30

रुटीन चेकअपसाठी (नियमित तपासणी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत

Shiv Sena chief Uddhav Thakre lodged at Lilavati Hospital, Prakruti Best | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल , प्रकृती उत्तम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल , प्रकृती उत्तम

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - रुटीन चेकअपसाठी (नियमित तपासणी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे रुग्णालयातर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात सांगण्यात आलं आहे. 
'उद्धव यांची प्रकृती ठणठणीत असून काळजी करण्याचं काहीच कारण नाही. आज दुपारनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल' असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 
दरम्यान यापूर्वी २०१२ मध्ये उद्धव यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली होती. त्यावेळी राज ठाकरेही उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. तसंच त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर स्वत: राज ठाकरे यांनी त्यांच्या गाडीचं सारथ्य करून त्यांना घरी सोडले होते. 
 

Web Title: Shiv Sena chief Uddhav Thakre lodged at Lilavati Hospital, Prakruti Best