शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra CM: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 08:39 IST

आज संध्याकाळी उद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामुळे पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती सरकारमध्ये दिसेल. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचं संपादकपद सोडलं आहे. सामनाच्या संपादकपदी संजय राऊत यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सध्या ते सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. शासकीय पदावर असताना वर्तमानपत्राच्या संपादकपदी राहता येत नाही. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी सामनाच्या संपादकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या संपादकपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. सध्या कार्यकारी संपादकपदी असलेले संजय राऊत यांनी नेहमीच सामनामधून शिवसेनेची बाजू लावून धरली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाला अंगावर घेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. अग्रलेख, ट्विट्स, पत्रकार परिषदा घेत त्यांनी दररोज भाजपावर हल्ला चढवला होता. त्यामुळे त्यांची सामनाच्या संपादकपदी निवड होऊ शकते. गेली अनेक वर्ष त्यांनी कार्यकारी संपादकाची धुरा सांभाळली आहे.उद्धव ठाकरेंपूर्वी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरेंकडे सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी होती. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव यांनी संपादकपदाची सूत्रं होती घेतली. मात्र आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्यानं ते या पदावरुन दूर झाले आहेत. आज संध्याकाळी शिवाजी पार्कवर उद्धव यांचा शपथविधी होईल. यंदा आदित्य यांच्या रुपात पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती निवडणुकीच्या आखाड्यात दिसली. आता उद्धव यांच्या रुपात पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील व्यक्ती सरकारचं नेतृत्त्व करताना दिसेल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना