शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

"शिवसेना-भाजपा नैसर्गिक युती व्हावी, उद्धव ठाकरेंनी सकारात्मक भूमिका घ्यावी’’, सेनेच्या अजून एका खासदाराचं स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 12:32 IST

Hemant Godse, Shiv Sena:  शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेना आणि भाजपा यांच्यातील नैसर्गिक युती व्हावी, तसेच त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असं मत मांडलं आहे. 

मुंबई - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आमदारांनी बंडखोरी करत शिवसेनेला धक्का दिल्यानंतर शिवसेनेचे अनेक खासदारही बंडाचा झेंडा हाती घेण्याच्या विचारात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, शिवसेनेचे लोकसभेतील अनेक खासदार भाजपाशी जुळवून घेण्यासाठी उत्सुक असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेना आणि भाजपा यांच्यातील नैसर्गिक युती व्हावी, तसेच त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असं मत मांडलं आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना हेमंत गोडसे यांनी सांगितले की, आदिवासी महिला देशाची राष्ट्रपती होतेय, त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यावा, असं मत बऱ्याचशा खासदारांनी व्यक्त केलं. त्यानंतर  उद्धव ठाकरे यांनी यावर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले. 

गोडसे पुढे म्हणाले की,  खरंतर मी नाशिकचा खासदार म्हणून ८ वर्षे काम करत आहे. कुठलंही काम करायचं ठरलं तर राज्य आणि केंद्र हे संयुक्तपणे करत असतं. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील युती नैसर्गिक युती आहे. नाशिक लोकसभेचा विचार केला या मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी नाशिक शहरातील तीन आमदार हे भाजपाचे आहे. तर ग्रामीण भागातील तीन आमदार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत. ते शिवसेनेविरोधात लढून निवडून आलेले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी कायम ठेवली तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी ते अडचणीचं ठरेल. शिवसेनेचा उमेदवार काय करेल, हा प्रश्न उपस्थित होईल, अशी भीती गोडसे यांनी व्यक्त केली.

भाजपासोबतचा २५ वर्षांचा युतीचा अनुभव आणि महाविकास आघाडीतील अडीच वर्षांचा आघाडीचा अनुभव पाहता आपण युतीकडे जावं. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन संवाद साधून मार्ग निघतो का हे पाहावं, असे मत अनेक खासदारांनी मांडली, असे हेमंत गोडसे यांनी सांगितले. तसेच भाजपा आणि शिवसेना यांच्यातील युती झाल्यास अनेक विकास कामं मार्गी लागतील, असं मतही हेमंत गोडसे यांनी मांडलं. युतीबाबत आम्ही आमचं मत पक्षप्रमुखांसोबत मांडलं आहे. आता ते त्यावर सकारात्मक भूमिका घेतील, अशी अपेक्षा हेमंत गोडसे यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदारांच्या झालेल्या बैठकीमध्ये काहीही करा पण भाजपसोबत चला. आपण भाजपसोबत गेलो नाही तर त्याचा मोठा फटका आम्हा सगळ्यांनाच बसेल. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही भाजप हाच आपला नैसर्गिक मित्र असून काँग्रेस, राष्ट्रवादी आपल्याला कधीही साथ देणार नाहीत, असे समर्थन बहुतेक खासदारांनी केले.असा आग्रह शिवसेनेच्या बहुतेक खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे  धरला. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांना सन्मानाने परत घ्या, यावरही खासदारांनी जोर लावला, अशी माहिती समोर येत आहे.

या बैठकीला प्रतापराव जाधव, कृपाल तुमाने, विनायक राऊत, सदाशिव लोखंडे, अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर, राहुल शेवाळे, राजेंद्र गावित, हेमंत गोडसे, ओमराजे निंबाळकर, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे, राजन विचारे हे खासदार उपस्थित होते.

टॅग्स :Hemant Godseहेमंत गोडसेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे